गरिबीत ढकलणारे दवाखाने : दारिद्र्याच्या शोधयात्रेत दिसलेले महाराष्ट्राचे आरोग्य (हेरंब कुलकर्णी )

दारिद्र्यात ढकलणारेआजारपण (दारिद्र्याची शोधयात्रा या अहवालाच्या निमित्ताने हेरंब कुलकर्णी यांनी २४ जिल्ह्यात १२५ गावांना भेटी दिल्या. त्या दरम्यान आरोग्याचे जे भीषण चित्र दिसले त्याचे हे अस्वस्थ करणारे तपशील..त्यातून कोरोना काळात आरोग्याची जी विदारक स्थिती निर्माण झाली त्याची कारणे कळतील ) नागपूर सोडलं आणिदिनानाथ वाघमारे, कवी प्रभू राजगडसोबत भटक्यांच्या वस्त्या पहायला गेलो. नागपूरजवळहिंगणा . रस्त्याच्या कडेला एक भटक्यांची पालं टाकलेली. पालावर उघड्यावर राहणारीही माणसे जेवणाला ही मोताद असतात....अशा रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना जेव्हा ह्रदयविकार होतो तेव्हा ते समजण्यापलीकडे असते. येथील भटक्यांच्या वस्तीत एक वैदू त्यांच्याकडच्या औषधाची माहिती सांगत होता..तेव्हा सहजपणे इथे भटक्या लोकांना कोणकोणते आजार आहेत ?विचारले तेव्हा तिथं राहणारे लोक काही आजारांची नावे सांगत होते .आतापर्यंत शांतपणे ऐकणारी एक वृद्ध महिला पुढे सरकली आणि बोलू लागली.. उषा गंगावणे या महिलेच्या आरोग्याची कथा विषण्ण करून टाकते. उषा आपल्या दोन मुलांसह राहतात.भंगार गोळा करतात.....भटक्यातील त्यागोंधळी समाजाच्याआहेत. कपडे देवून केस विकत घ्यायचे असा व्यवसाय करतात. पावसाळ्यात रोज ५० ते ६० रुपये मिळतात आणि इतरवेळी १०० ते १२५ रुपये मिळतात. उषाबाईंचा नवरा खूप दारू प्यायचा.त्या नशेतच तो वारला.त्या मुलांना घेवून या झोपडपट्टीत आल्या .मुलेही मजुरी किंवा काम साफ करणे किमा तत्सम कामे करतात. उषाबाईंना एकाचवेळी हृदयविकार, अल्सर आणि किडनीचा विकार आहे. त्यांनी जवळच्या पैशाने अंजिओग्राफी केली .त्यात त्यांच्या हृदयाची झडप नादुरुस्त आहे. तुमचे जिवंत राहणे कठीण आहे असे डॉक्टर सांगतात.. त्याचे तातडीने ऑपरेशन करणे आवश्यक आहे.मी पुस्तकी भाषेत म्हणालो की शासन मदत देते ना ? त्या शांतपणे म्हणाल्या पण त्याचा खर्च शासकीय मदत वगळता आणखी दीड लाख रुपये लागतील. इतकी रक्कम त्यांच्याकडे नाही म्हणून मग आता त्या केवळ गोळ्या घेतात आणि राहतात. किडनीसाठी ही गोळ्याच घेतात. ह्रदयविकारामुळे त्या जड वस्तु उचलू शकत नाही. भंगार गोळा करायला फार फिरू शकत नाहीत. कधीकधी गोळ्या घ्यायलाही पैसे नसतात.अशावेळी खूप छाती दुखते.जीव घाबरा होतो. पण अशावेळी त्या तशाच पडून राहतात. मुलांना फार वेळा पैसे मागता येत नाही.अल्सरवर डॉक्टर म्हणाले की तिखट खाऊ नका तोच उपचार आहे.. त्यांना वेगळा स्वयंपाक रोज करणे शक्य नसते आणि भिक मागून आणले तर त्यात तिखट भाजी असली कि पोट दुखायला लागते .. त्यांची एक नातेवाईक चर्च मध्ये जाते व येशूच्या कृपेने तिची गाठ बरी झाली आहे. त्यामुळे आता उषाबाई ही चर्च मध्ये जातात.उषाबाईनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. धर्मांतराची चर्चा नेहमी होते पण या अगतिकतेतून मानसिक आधार शोधायला जाणारी उषाबाईची ही ही धार्मिकता कशी समजून घ्यायची ... उषाबाईची घरवापसी कोण करणार ??? जवळच उषाबाईचा भाऊ बसला होता. तोही बोलू लागला. त्याची बायको एक वर्षापूर्वी ह्रदयविकार शस्त्रक्रिया होऊनही मृत्यू पावली. तिच्या उपचारासाठी त्याने नागपूरमध्ये असलेले त्याचे ५ लाख रुपयांचे घर विकले..घाईत विकावे लागल्यामुळे कमी किंमत मिळाली....बायपास शस्त्रक्रिया करावी लागली. नंतर घर नसल्याने तो पांढरकवडा येथे राहायला गेला. एक दिवस पत्नी खूप घाबरी झाली.दवाखान्यात तो घेऊन गेला.नर्स ने इंजेक्शन देताच खूप घाम आला व ती तिथेच मृत्यू पावली. ते इंजेक्शन चुकीचे दिले असा त्याचा आरोप आहे.त्याला विचारले की तू तक्रार का केली नाहीस ?तो म्हणाला की आमचे नातेवाईक म्हणाले कशाला झंझट वाढवतो ?आपण गरीब माणसे आहोत.तेव्हा त्याने तक्रार केली नाही.बायको गेली.नागपूरमधील खूप कष्टाने घेतलेले घर गेले आणि आता तो एका हॉटेलात आचारी म्हणून काम करतो आहे....उषाबाईआणि त्यांच्या भावाकडे मी हताशपणे पहात होतो. शस्त्रक्रिया करू न शकणारया उषाबाई आणि शस्त्रक्रिया करूनही सर्वस्व गमावलेला त्यांचा भाऊ. यां गरीब भटक्याच्या पालावर इतक्या महाग आजाराने का यावे ? मला रोज मरणाच्या सावलीत उषाबाई कशा राहत असतील,गोळ्यांना पैसे नसताना त्या पैशासाठी भंगार गोळा करायला जातांना उषाबाई दिसू लागल्या...छातीतली कळ दाबतभंगार वेचणारी ही उषाबाई आणि तिच्याच जिल्ह्याचे मुख्यमंत्री सरकारने किती रुग्णांना मदत केली आणिमहात्मा फुले आरोग्य योजनेची जाहिरात करतात.....हे सारे कसे समजून घ्यायचे....?हाय वे वरून वेगानं वाहतूक सुरु होती आणि या गर्दीत ही एकटी उदास माणसे की त्यांचे हे आजार दुखणे कुणाच्या गावीही नाही... गरिबांच्या वस्तीत उषाबाई मला पुन्हा पुन्हा भेटत राहिल्या .. उस्मानाबाद जिल्ह्यातील जेवळी येथे भटक्याच्या वस्तीत गेल्यावर एका महिलेने पतीच्या हृदयविकाराच्या उपचारावरखर्च ५ लाख रुपये झाल्याचे सांगितले. एवढे करून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. जावयांनी मदत केली व काही उसने आणि कर्जाने काढले पण आजपर्यंत फक्त त्यातील ५०००० रुपयेचफक्त ३ वर्षात फिटले आहेत. एका कुटुंबात मुतखडा आजारात ७०००० रुपये खर्च झाल्याचे एका गरीब भटक्या व्यक्तीने संगितले. ग्रामीण व दुर्गममहाराष्ट्रातफिरताना सगळ्यात अस्वस्थ आणि जीवघेणा प्रश्न दिसतो तो आरोग्याचा. या प्रश्नामुळे माणसे पुन्हा पुन्हा दारिद्र्यात ढकलली जात आहेत..अशी आकडेवारी वाचलेली असते पण प्रत्यक्षात या फाटक्या माणसांनी कर्जबाजारी होऊन केलेले उपचार आणि त्याने झालेली दैना प्रत्यक्षातबघणे खूप क्लेशदायक असते. मी निवडलेली गावे ही कमी लोकवस्तीची होती.त्यमुळे एक वेगळाच मुद्दा लक्षात आला की आरोग्य उपकेंद्रासाठी लोकसंख्येची किमान अट असल्याने त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात आरोग्याची खूपच दैन्यावस्था आढळते. त्याठिकाणी ज्यांच्याकडे ती गावे दिली आहेत ते डॉक्टर नर्स फारसे येत नाहीत असे आढळले. जालना जिल्ह्यातील माळवाडी गावजवळून उपकेंद्र खराब रस्त्याने 3 किमी व लांबून चांगल्या रस्त्याने गेले तर ७ किमी वर दवाखाना आहे. अशा गावात १० पेक्षा जास्त महिलांची प्रसूती दवाखान्यात नेताना रस्त्यात किंवा गाडीत झाल्याचे गावकर्यांननी सांगितले. या गावाकडे जाणारा रस्ता १५ वर्षापूर्वी झाला होता.आज मंत्रालयापर्यंत निवेदने देवून रस्ता होत नाही.त्यातून तातडीने पेशंट नेणे कठीण होते.एकजणाला एकदा चाकू लागला,४ जणांनी रागात विषप्राशन केले तर एकजण विहिरीत पडला या सर्व केसमध्ये सर्वजण जवळ दवाखाना नसल्याने मरण पावले.अशावेळी तातडीने गाडी बघावी लागते व दवाखान्यात पोहोचणे खूप कठीण होते. भामटवाडी (जि बीड) येथे रस्ता मध्येच तुटल्याने दुरावस्था आहे .त्यात आरोग्यकेंद्र लांब आहे. गंगाराम नावाचा शेतकरी शेतात गेला .त्याला साप चावला .तो तसाच पायी गावात आला. गावात गाडी नव्हती. गाडी कशीतरी मिळवली .तेथून अकोला ५० किमी आहे .तिथे नेले पण खूप उशीर झाल्याने गंगाराम मरण पावला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर मोठेवाडी नावच्या गावापासून दुसरे मोठे गाव १० किलोमीटर वर आहे, तिथे एकदा एक गरोदर महिलेचे दिवस भरले आणि गाडी मिळता मिळता उशीर झाला. शेवटी रस्त्यात एका झाडाखाली बाळंतपण करावे लागले आणि पुन्हा परत घरी तिला आणावे लागले हीच स्थिती नंतर अनेक गावात आढळली. रस्ते चांगले नाहीत त्यामुळे यां दुरावस्थेत अधिकच भर पडली. मीगरीब कुटुंबात सूरवातीला जायचो.. त्यांना विचारायचो की आजार कोणते आहेत ? ते म्हणायचे कोणतेच आजार नाहीत. मला खूप बरे वाटायचे की चला गरीब माणसे आरोग्यसंपन्न आहेत पण माझ्या या गैरसमजाला अभिनेता राजकुमार तांगडे यांनी धक्का दिलां . ते म्हणाले की आज ग्रामीण भागातल्या माणसांना किती व कोणते गंभीर आजार आहेत हे तुम्ही सांगू शकत नाही कारण हे लोक कधी तपासत नाही की कोणत्याच टेस्ट करीत नाहीत .त्यामुळे कदाचित असतीलही गंभीर आजार पण माहीत नाहीत अशी त्यांची स्थिती आहे .काम करताना दुखले तर मेडिकल मधून गोळ्या आणतात आणि गप्प राहतात आणि अगदी पडूनच राहिले बेशुद्ध झाले तर मग दवाखान्यात जातात मग तपासणीत गंभीर आजार सापडतात. त्यावेळी वेगळेच वास्तव लक्षात आले. एखादागंभीर आजार एखाद्या कुटुंबाला भीषण दारिद्र्यात कसे ढकलते याची उदाहरणे अनेक वस्त्यात दिसली. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात महेंद्रवाडी येथील फाट्यावर थांबलो.लवांडे कुटुंबातील हिराबाई या ऊसतोड करणार्याा महिलेला कॅन्सर झाला. या कुटुंबाला ४ एकर शेती आहे व दोन मुले व दोन मुली. २ मुलींची लग्न झालीत. एकूण खर्च ८ लाखापेक्षा जास्त झाला. १५ हजारांची इंजेक्शन द्यावी लागली. पुण्यात रुबि हॉल मध्ये ठेवले होते.त्यांचा मुलगा ११ वीत शिकत होता . त्याला १०वीला ७५ टक्के गुण मिळाले होते व तो अतिशय हुशार होता. आईचे स्वप्न होते की त्याने शिकावे आणि नोकरीला लागावे म्हणून तो खूप शिकत होता पण इतका प्रचंड खर्च झाला म्हटल्यावर व कर्ज झाल्यावर त्याने शाळा सोडली आणि उस तोडायला जायला लागला. आम्ही त्याला फक्त शाळा का सोडली ? असे विचारले तेव्हा तो धाय मोकलून रडायला लागला. मला खूप खूप शिकायचे होते असे तो म्हणत होता. १ ली ते ७ वी ला ती सोमेश्वर नगर ला राहिले. आणि निराश होऊन आता मजुरी करतो आहे.आम्ही त्याच्या घरी गेलो .घरातील उदासी प्रत्येक गोष्टीतून डोकावत होते.. उसतोडीला जोडी लागते त्यमुळे लवकर लग्न केले..त्याची पोरसवदा वयाची बायको समोर आली..सासूच्याआजाराचेकर्ज ती आता अनेक वर्षे उस तोडून फेडणार होती..घराच्या मागच्या बाजूला असलेली त्याची शेती बघितली. हेतु हा की मला शेतीतून काही रक्कम उभी राहील का ?पण अवघी दीड एकर जमीन उतारावर होती.. अगदीचकेविलवाणी होती... घरावर झालेले कर्ज फेडायला आता शिक्षणाचे ध्येय बाजूला ठेवून केवळ मजुरी हाच त्याला पर्याय नाही..आम्ही त्याला बाहेरून परीक्षा द्यावीस असे सांगत होतो..पण त्याची स्थिती बघून आमच्या सांगण्यातील फोलपणा आमच्याच लक्षात येत होते. गरीब कुटुंबाची आजाराने होणारी वाताहत ऐकवत नाही.. स्वयंसहायता गटाची एक महिला झरीत भेटली. तिच्या मुलाला फिटचा आजार आहे. दोन तपासण्याला ८००० रुपये लागले आणि आता महिन्याला १००० रूपयाच्या गोळ्या लागतात. नवरा किडणीच्या विकाराने आजारी आहे.त्याला महिन्याला ५०० रूपयाच्या गोळ्या लागतात. एकूण गोळ्यांचा नवरा व मुलगा असा १५०० रुपयांचा खर्च आहे. नवर्या०ने काम केले तर हात पाय सुजतात. त्यामुळे 3 एकर शेती असूनही ती बिगारीने दिली आहे .त्याचे ४००० रुपये फक्त मिळाले व ही महिला आज मजुरीला जाते. शेती करीत नाही मग ३३००० रुपयाचे घेतलेले बैल २८००० रुपयात विकले.एकाचवेळी दोघांचा उपचार करावा लागतो. नागपूर ,चंद्रपूरला न्यावे लागले. सरकारी दवाखान्यात नीट लक्ष दिले नाही म्हणून खाजगी त न्यावे लागले .खाजगी दवाखान्यात अगोदर ५०,००० भरा असे सांगितले. या सर्व उपचारांसाठी आता एकूण २ लाख कर्ज झाले आहे. ते कर्ज दीडपट व्याजाने फेडायचे आहे. हे फेडायला या बाई रोज दोन वेळा मजुरीला जातात. सकाळी ७ ते १२ एका शेतात काम करतात आणि दुसरीकडे दुपारी १ ते ६ असे काम करतात . दोन्ही मिळून २०० रुपये मिळतात.वडील मदत करतात म्हणून चालले आहे . या २०० रुपये रोजातून महिन्याला १५०० रुपयाची औषधे ही काशी आणील आणि व्याजासह ३००००० रुपये आता कसे उभे करील ? नुसत्या या विचारानेच थरकाप होतो जत तालुक्यात महाराष्ट्र कर्नाटक च्या अगदी सीमेवर जालिहाळ गावात दुष्यंत कुंडले यांच्या घरी गेलो .त्यांच्या तीनही मुली शाळेत अतिशय हुशार आहेत. पण त्यांना मित्रांच्या संगतीने दारूचे व्यसन लागले आणि आजारी पडू लागले. थेट किडनी आणि लिव्हरचा आजार झाल्याने आतापर्यंत ८ लाख २५ हजार रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे २ एकर जमीन विकावी लागली . ती विकून चार लाख रुपये आले व उरलेल्या रकमेचे कर्ज झाले आहे. आरोग्याचा प्रश्न एखाद्या कुटुंबाला पुन्हा पुन्हा गरिबीत कसं ढकलतो याचे हे उदाहरण ठरावे आणि कर्जबाजारी होऊनही जर पेशंट बरा झाला नाही तर पेशंट ला नाईलाजाने घरी आणले जाते..पैसे नसल्यने डोळ्यासमोर माणूस मरतो आहे हे बघणे हे लोक कसे सहन करीत असतील ?सुंदरबन पोड यवतमाळ येथील रामदास अत्राम हा ३५ वर्षाचा तरुण मृत्यूमुखी पडला. त्याचे वृद्ध वडील भेटले ते म्हणाले की त्याला किडणीचा त्रास होता. डॉक्टरने त्याला मोठ्या दवाखान्यात न्यायला सांगितले. सेवाग्रामला नेले. घरातला बैल फक्त ६००० रुपयात विकला .घरातील बकर्याल २ हजारात विकल्या. अतिदक्षता विभागात ठेवायला रोज १५०० रुपये पडतील असे सांगितले व एकूण २०००० रुपये खर्च येईल.आम्ही सोबतचे ८००० रुपये खर्च केले आणि नंतर ते पैसे संपल्यावर घरी घेवून आलो. नंतर तो मरण पावला.अशी अनेक उदाहरणे या प्रवासात ऐकायला मिळाली.... एकजण म्हणाला “आणि समझा मोठा आजार झाला तरी आम्ही शहराचे तिकीट काढण्यापेक्षा आम्ही वरचे तिकीट काढू “ राष्ट्रीय आरोग्य अभियानात जास्तीत जास्त बाळंतपण हे दवाखान्यात होत असल्याची जाहिरात केली जाते. त्यात बाळंत महिलेला जननी सुरक्षा योजनेत पैसे मिळतात.पण या योजनेचे पैसे मिळायला खूप त्रास आदिवासींना होतो आहे.बुलढाणा जिल्ह्यातील दूर डोंगरावर राहणार्यास आदिवासींची वेदना ऐकल्यावर प्रशासनाचा असंवेदनशीलता लक्षात येते. बाळंत झाल्यावर दिला जाणारा चेक हा त्या महिलेच्या नावावर असतो. त्यामुळे महिलेला सोबत न्यावे लागेल असे त्यांना सांगितले गेले.भिंगारा गावातील लोकांना जामनी येथे जाण्यासाठी किमान २० किलोमीटर चालावे लागते. तो घाट उतरणे हा त्यांच्यासाठी जवळचा रस्ता आहे.बाळंत झालेली बायको मुलासह २० किलोमीटर घेऊन पायी हे आदिवासी २० किलोमीटर चालत गेले . तेथे गेल्यावर एकदा खात्यात पैसे नव्हते. तिथे गेल्यावर खाते उघडा असे सांगितले.पुन्हा एक चक्कर झाली. एक आदिवासी तेथे गेला तर तो चेक ३ महीने झाल्यामुळे चेकची मुदत संपली होती .हा चेक तीन महिन्यात भरावा लागतो एवढे या आदिवासींना सरकारी यंत्रणा सांगत नाही इतकी बेपर्वाई आहे. एक म्हातारा म्हणाला “भाऊ ते पोरगं २० किलोमीटर पायी घेऊन गेल्यावर ते लाल जरद पडतं. रस्त्यात पाणीही प्यायला मिळत नाही “ कुपोषणावर चर्चा होताना गरोदर मातांची शासन किती काळजी घेते याची जाहिरात केली जाते. भंडारा जिल्ह्यात भिलेवडा येथे पिंकी नावाची गरोदर महिला भेटली. तिला ६ व महिना सुरू होता .सोबतच्या दीनानाथ वाघमारे यांनी तिची कागदपत्रे बघितली तर तिच्यात रक्त खूप कमी होते. रक्त का भरले नाही विचारले तर डॉक्टर उत्पन्नाचा दाखला मागतात असे सांगितले. तेव्हा दारिद्र्यरेषेखाली समजून तिला उपचार मिळेल. हे कुटुंब गावकर्यांदनी वस्ती पेटविल्यामुळे मूळ गाव सोडून इथे वस्तीला आलेले.त्यांना इथला रहिवासी दाखला कोण देणार ? तलाठ्यांना फोन केला तर ते म्हणाले की ती वस्ती माझ्या हद्दीत येत नाही. आशा स्थितीत या लोकांनी काय करावे ? गरोदर असलेल्या तिला काय जेवण केले विचारले तर ती म्हणाली की फक्त भात,भाजी व वांग्याची भाजी खाल्ली आहे. सोनोग्राफी केलेली नाही अनेकदा चुकीचे उपचार केले जातात आणि त्याची किंमत गरिबांना चुकवावी लागते.रुईपठारया मेळघाटमधीलगावात सीताराम चतुर याच्या पोटाची शस्त्रक्रिया होकुटुंबाला ताना चुकीची नस कापली गेली त्यामुळे खाल्लेले अन्न बाहेर यायचे. एक लाख रुपये खर्च झाला आणि डॉक्टर ने ते मान्य केले नाही . त्याकुटुंबाला ५००००० रुपयांची भांडी कर्ज काढण्यासाठी गहाण ठेवावी लागली. शेतातील दोन बैल विकावे लागले. गरजेसाठी घाईत विकावे लागले त्यामुळे खूप कमी किमतीत ते विकावे लागले. भामरागड लाभेट दिली तेव्हा लोकबिरादरीतआमटे कुटुंबियांशी चर्चा करतांना दिगंत आमटे यांनी अनेक धक्कादायक तपशील सांगितले..iron गोळ्या खाल्ल्यामुळे बाळ मोठे होते आणि बाळंतपणाला त्रास होतो असा समज पसरल्याने आदिवासी महिला आता iron गोळ्या खात नाहीत फेकून देतात. अस्वलाने सोललेले पेशंट पूर्वीपेक्षा कमी झाले पण अजूनही अधूनमधून तसे पेशंट येतातच. महिलांचे हिमोग्लोबिन क्वचितच १० पेक्षा जास्त आहे. सरासरी हिमोग्लोबिन ६ ते ८ आहे. ग्रामीण आरोग्य केंद्र कसे काम करतात ? हेविचारल्यावर त्यांनी सांगितले की तालुक्यातील ४ आरोग्यकेंद्राची वर्षाची OPD ही १७००० आहे आणि एकट्या लोकबिरादरीची OPD ही ३३००० आहे. यावरून आरोग्यकेंद्राची कार्यक्षमता लक्षात यावी. आदिलाबाद या २०० किलोमीटरवरूनपेशंट इथे येतात. रोज १०० ते १५० पेशंट येतात. या पेशंटची संख्या तेथील जवळचे आरोग्यकेंद्र नीट सुविधा देत नाहीत त्यामुळे ही संख्या वाढते आहे. ग्रामीण आरोग्य केंद्र कसे आहेत ? यावर ते म्हणाले की केंद्रात मलेरियावरील औषधे नाहीत आणि मलेरिया टेस्ट करण्याची साधने नाहीत. रोग प्रतिबंधित औषधे नसतात आणि पावसाळ्यापूर्वी stock केला जात नाही. सोनोग्राफी मशीन नसते आणि सर्जन जरी असले तरी तिथे भूलतज्ञ नाहीत…. सरकारीदवाखान्यानी विश्वासार्हता किती टोकाची गमावली आहे ? त्यापेक्षा लोकांना मांत्रिक जवळचा वाटतो. मानगाव च्या उतेखोलवाडी चा तो मासे मारी करणारा मजूर नेहमी आठवत राहील. गावापासून २ किलोमीटरवर असलेल्या एका तळ्यात त्याने मासेमारीसाठी जाळे लावले आणि मासे आणायला गेला.वेळ संध्याकाळची होती . मासे काही मिळाले नाही. त्याने जाळे काढले आणि निघाला. रस्त्यात गवतातून चालताना त्याच्या पायाला साप चावला. त्याच्या ते लक्षात आले आणि तो तिथून दोन किलोमीटर पळत आला. घरी आला तेव्हा चक्कर ययाला लागली होती .आजूबाजूच्या लोकांनी त्याला लगेच उचलून मांत्रिकाकडे नेले. मांत्रिकाकडे गेल्यावर त्याने त्याला दोरीने बांधले व मारायला सुरुवात केली. काही तासांनी त्याला बरे वाटले. मी त्याला विचारले की सरकारी दवाखान्यात का गेला नाही ? तो म्हणाला की काय करणार ?दवाखान्यात जास्त वेळ ठेवत नाही ते लगेच म्हणतात मोठ्या दवाखान्यात जा आणि तिकडे रात्री कुठे जाणार ? गाडी करून जायला पैसे नसतात. त्यामुळे मांत्रिक त्यापेक्षा भरवशाचा वाटतो. अंधश्रद्धा म्हणून मांत्रिकाकडे जाणे आपल्याला खटकते पण त्यामागे या लोकांना सरकारी दवाखाने त्यांच्या बेपरवाईमुळे आपले विश्वासाचे वाटत नाही याचे काय करायचे ? हा प्रश्न मला महत्वाचा वातताओ .या दवाखान्यांवर श्रद्धा निर्माण व्हावी असे सरकार आणि तिथले कर्मचारी वागत नाहीत मग लोक अंधश्रद्धांकडे वळले तर दोष कुणाचा ? 4 हेरंब कुलकर्णी महालक्ष्मीमंदिराजवळ, मुपोता अकोले जि अहमदनगर ४२२६०१ फोन ८२०८५८९१९५ एका महिलेला विचारले की सरकारीदवाखान्यात कां नाही जात ? तेव्हा ती पटकन म्हणाली“ सरकारीदवाखान्यात काय राहते? असतातदोन गोळ्या...”

टिप्पण्या

  1. मेरा भारत महान.....! हे फक्त लिहायला आणि वाचायला छान आहे.
    अर्वाचीन भारतामध्ये वैद्यकशास्त्र हे लोकांच्या आरोग्य चांगले राहावे यासाठी कार्यरत होते. परंतु सध्या आजारी किंवा रोगग्रस्त रुग्णांना उपचार करण्यासाठीच वैद्यकशास्त्र आहे अशा आविर्भावात मध्ये प्रशासन समाज आणि इथली सगळी यंत्रणा काम करते. "परिस्थिती अत्यंत भयावह आहे...! निरामय आरोग्यासाठी नितांत गरजेचे असणाऱ्या बाबींकडे आपले आणि व्यवस्थेचे अक्षम्य दुर्लक्ष आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे."
    सर...... आपले निरीक्षण आणि लेखन इथल्या यंत्रणेचा डोळ्यात अंजन घालणारे आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. अंतराळ क्षेत्रात पुढाकार घेणारा आपला देश सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवताना इतका मागासलेपणा दाखवतो कारण हे क्षेत्र वलयांकित नाही ......

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय भयान वास्तव...
    मध्यमवर्गीयांना गरिबीत आणि गरिबांना भिकेला लावणारे सरकारी धोरण.
    देश बदलण्याच्या प्रतिक्षेत आम्ही लाचार नागरिक....😢😢

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय भयान वास्तव...
    मध्यमवर्गीयांना गरिबीत आणि गरिबांना भिकेला लावणारे सरकारी धोरण.
    देश बदलण्याच्या प्रतिक्षेत आम्ही लाचार नागरिक....😢😢

    उत्तर द्याहटवा
  5. अतिशय भयानक वास्तव.गरीबीमुळे आजारपण आणि आजारपणामुळे पुन्हा गरीबी या चक्रातून सुटणे ,केवळ अशक्य आहे.यासाठी समाजमन घडणे आवश्यक आहे.सामाजिक बांधिलकी तयार होणे गरजेचे आहे.प्रशासकीय व्यवस्थेचा बेजबाबदार पणा वेळोवेळी निदर्शनास येत राहतो.सरकारी सोयी ,सुविधांवरचा समाजाचा भरोसा उठतो.नकळत खाजगीकरण बोकाळतो.पुन्हा गुलामी कडे वाटचाल सुरू होते.हे दुष्टचक्र थांबण्यासाठी सक्षम ,सुद्रुढ, लोकशाही वादी ,व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक कार्यक्षम करणे आवश्यक आहे. या क्षेत्रातील भ्रष्टाचार नियंत्रित करण्यासाठी आवश्कतेनुसार कठोर उाययोजना केल्या पाहिजे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा