महात्मा गांधी च्या आयुष्याचा आज एक हिशोब मांडू या
****************************** *********************
महात्मा गांधी अनेकांना अनेक कारणांसाठी भावतात
पण मला ते भावतात त्यांच्या time management साठी
कमीत कमी वेळेत एखादा माणूस किती कामे करू शकतो ,
किती लेखन करू शकतो याचे गांधी हे उदाहरण ठरावे
* * * * * * * * *
गांधी भारतात १९१५ ला आले .
१९१९ ला रौलेट act मुळे ते देशाला माहीत झाले . १९१९ ते १९४७ या २८ वर्षात ते ६ वर्षे ५ महीने
तुरुंगात होते .म्हणजे ते वजा केले तर
म्हणजे साडे एकवीस वर्षे त्यांना मिळाली .
त्यातही १४० दिवस त्यांनी उपोषण केले म्हणजे २१ वर्षे मिळाली
अवघ्या या एकवीस वर्षात झोपेचे तास वजा केले तर तो कालावधी आणखी कमी होईल
त्फयाकाळातील संथ क्त रेल्वे प्रवासात घालवलेली वर्ष जर वजा केली
तर आणखी वेळ कमी होईल .
या काळात फेसबुक ,मोबाइल ,व्हाट्स अप असे काहीच मदतीला नव्हते .
तरी इतक्या कमी काळात
या माणसाने
स्वातंत्र
चळवळ भारताच्या ७ लाख खेड्यात नेली ..
दोन वृत्तपत्रे चालवली .
हजारो पृष्टा चे लेखन केले .त्यांनी लिहिलेल्या शब्दांची एकूण संख्या १० मिलियन म्हणजे एक कोटी आहे
म्हणजे दिवसाला त्यांनी साधारणपणे ७०० शब्द इतक्या व्यस्त कार्यक्रमात लिहिली
केवळ रोज दात घासताना गीतेचे १३ अध्याय पाठ केले
येरवडा तुरुंगात संपूर्ण १८ पर्व महाभारत वाचून काढले
रोज चरख्यावर सुत कातून विशिष्ट सुत कातणे थांबले नाही
की पाहते ४ वाजता उठणे आणि प्रार्थना थांबली नाही
इतकी सारी व्यस्त जीवनशैली असताना या माणसाने किती चळवळी सुरु केल्या ?
अस्पृश्यता विरोधी चळवळ ,
दारूबंदी
चळवळ ,
खादी निर्मिती उद्योग
बुनियादी शिक्षणाच्या शाळा सुरू करणे ,
कुष्टरोग निर्मूलन चळवळ
,निसर्गोपचार आरोग्य चळवळ
हिन्दी प्रसार
चळवळ या चळवळी सुरू केल्या ..
त्यांना गती दिली .
हे सारे कोणतीही सोशल मीडिया आणि वेगवान साधने हाती नसताना केवळ २१ वर्षात केले आहे ....
. गांधी विचार पटो की न पटो .. हा हिशोब आज स्वत :शी आपण स्वत : शी लावून बघायला हवा ..
.इतकी
अत्याधुनिक साधने आपल्या हाताशी असून आपण इतक्या मोठ्या आयुष्यात काय दिवे लावतो आहे .
.मला गांधी जयंतीला गांधी या बाबींसाठी
प्रेरक वाटतात आणि त्यादृष्टीने त्यांचा अभ्यास करावासा वाटतो
या देशातील सर्वात मोठ्या आंदोलनाचा नेता २१ वर्षात एक कोटी शब्द लिहितो .रोज ७०० शब्द लिहितो .आपण काय करतो आहोत ??
हेरंब कुलकर्णी
खूप महत्वाची गोष्ट आपण अधोरेखित केली आहे. आत्मपरीक्षण करायला लावणारी आणि प्रेरणादायी👌👌👌👌
उत्तर द्याहटवाप्रेरणादायी आणि आत्मपरीक्षण करायला लावणारी माहिती .
उत्तर द्याहटवाप्रेरणादायक,आजच्या तरूणांनी चिंतन करावे .परदेशात भारताला गौतम बुध्द,गांधीजी या दोन नावांनीच ओळखतात.
उत्तर द्याहटवाअज्ञानी मानवाच्या ज्ञानात भर पडली.
उत्तर द्याहटवागांधीजी के मार्ग पर चलना आसान नहीं है।