विनोबा भावे आणि शिक्षक होणाऱ्या व्यक्तीतील टोकदार
संवाद
----------------------------------------------------------------------------------------
विनोबा भावेंकडे एक गृहस्थ देशसेवा करण्यासाठी
आश्रमात आले.
विनोबांनी विचारले “तुम्ही कोणते काम करू शकाल ?”
ते गृहस्थ म्हणाले “ मी फक्त शिकवण्याचे काम करू
शकेल ? “
विनोबांनी विचारले “ तुम्ही काय शिकऊ शकाल ? सुत
कातणे, पिंजणे, विणणे शिकऊ शकाल का ? “
“ नाही , ते नाही शिकवता येणार “
“मग शिवणकाम, रंगकाम, सुतारकाम शिकवता येईल का ? “
“नाही असले कांही मला शिकवता येणार नाही “
“स्वयंपाक करणे, दळण करणे, अशी घरगुती कामे शिकवू
शकाल का ? “
“नाही अशी मी कोणतीच कामे केलेली नाहीत “
“मग किमान बागकाम मुलांना शिकऊ शकाल का ? “
तो गृहस्थ वैतागून म्हणाला “ तुम्हाला सांगितले ना
मी फक्त शिक्षणाचे काम करू शकेल.मी फक्त मराठी साहित्य शिकवू शकेल “
विनोबा म्हणाले “ बरे झाले तुम्ही साहित्य शिकवू
शकता. मुलांना ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ शिकऊ शकाल का ?
ते गृहस्थ चिडले तेव्हा विनोबा म्हणाले “ शांती, क्षमा,
तितिक्षा कशी राखावी हे शिकवू शकाल का ?
गृहस्थ वैतागले तेव्हा विनोबा म्हणाले “ ठीक आहे, लेखनाचा
थोडाफार उपयोग आहे पण तुमची स्वत:ची काय शिकण्याची तयारी आहे ? विणकाम शिकाल का ? “
“आता शिकण्याची हौस वाटत नाही. हाताला तशी सवय नाही
“
पण थोडा शिकायला वेळ लागेल पण येणारच नाही असे
थोडेच आहे ? “
गृहस्थ म्हणाले “मला वाटते
येणारच नाही आणि आले तरी मला त्याचा कंटाळा वाटतो. पण ते माझ्याच्याने होणार नाही
असेच तुम्ही समजा “
विनोबा आणि शिक्षक होऊ बघणारा देशभक्त यांच्यातील
हा संवाद आहे पण हा संवाद वाचताना आपण शिक्षक म्हणून अंतर्मुख होतो की आपण शिकवतो
पण कितीतरी जीवन उपयोगी कौशल्ये आपल्यात नाहीत याची जाणीव हा संवाद करून देतो. सध्याचे
शिक्षणही आपल्याला ती फार मागत नाही पण अनेक प्रकारची कौशल्ये आपल्याला आली पाहिजेत
आणि आपण ती शिकलो पाहिजे हे यानिमित्ताने विनोबा आपल्याला लक्षात आणून देतात . विनोबांची
१२५ वी जयंती सुरु झाली आहे त्यानिमित्ताने
हेरंब कुलकर्णी
शिक्षण तत्व आणि व्यवहार
विनोबा
परमधाम प्रकाशन (९५४५६०५५३६)
|
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा