मेधा पाटकर यांची उत्कटता आणि समाज म्हणून आपली मानसिकता यावर ही कविता
प्रिय मेधा ,
धुवांधार कोसळत्या पावसात,
दारं खिडक्यासह स्वत:ला
स्वेटर मफरलमध्ये बंद करून बसलेला मी,
एका हातात चहाचा कप
आणि दुसऱ्या हातात रिमोट घेतलेला.....
अशा रम्य वातावरणात
दिसतेस मला तू
एका न्यूज चॅनलवर उभी
‘डुबेंगे पर हटेंगे’ नही च्या निर्धाराने
‘तुझी
बांधिलकी कि स्टंट’?
‘तू हट्टी कि
दुराग्रही’?
‘विकासवादी
कि विकासविरोधी’?
याची
चर्चा मी
चहाच्या घोटा घोटाने करीत राहतो
मेधा ,
आमच्यासारखी
आत्ममग्न सुरक्षित बेटं
पाण्याखाली
का ग जात नाहीत ....?
------------------------------------------------------------------------------------------------- हेरंब कुलकर्णी
महालक्ष्मी
मंदिराजवळ, मुपो ता अकोले
जि
अहमदनगर ४२२६०१
फोन
८२०८५८९१९५

सुंदर कविता
उत्तर द्याहटवाशब्द सुमन
उत्तर द्याहटवा