आश्रमशाळा
आश्रमशाळांचे वास्तव मांडणारा लेख
आश्रमशाळांचे वास्तव मांडणारा लेख
haoLIcaa saNa ha AaidvaasaI Baagaat KUp
maaoza saNa.yaa saNaacyaa kaLat AaidvaasaI Baagaatlyaa AaEamaSaaLa baMdca
Asatat.मुलांना आश्रम शाळेतून सणासाठी घरी सोडलं जातं. maulaM gaolaI
kI 8 idvasa trI yaot naahI.Saalaabaahya maulaaMcaa AByaasa krayalaa maoLGaaTat
gaolaao.tovha naomaka haoLIcaa saNa
2idvasaavar Aalaolaa haota.%yaamauLo yaa Kopolaa kaya-k%yaa-Mnaa
BaoTayacaM AsacaM zrvalaM haotM.AaEamaSaaLot kuNaI BaoTola AsaM gaRhItca QarlaM
navhtM..maoLGaaTatlyaa Aamacyaa ima~aMnaa mhNajao maoLGaaTima~cyaa rama fMD
AaiNa Kaojacyaa baMDyaa saanaolaa BaoTlaao.sajagapNao maoLGaaTcao ica~Na
krNaaro p~kar jayakumaar caj-ana yaaMcyaasaaobat kahI gaavao baGaayalaa
inaGaalaao. haoLIcao idvasa
haoto.bahusaM#ya ivaVaqaI- gaavaakDo gaolaolao.trIhI AamhI kahI AaEamaSaaLaMnaa
BaoTI idlyaaca.
jaamalaI ho
gaava.[qaM AamadaraMcaI KajagaI
AaEamaSaaLa.AaEamaSaaLa mau#ya rs%yaavar naahI tr rs%yaacyaa pazImaagacyaa
baajaUlaa.Aqaa-t SaaLa baMd haotI.SaaLa गावापासून
उंचीवर eka baajaUlaa AsalyaamauLo kuNaI gaavakrI itkDo jaat nasaavaot.trIhI
laaMbaUna baMd idsaNaa yaa SaaLot AamhI sahja Daokavayaalaa gaolaao.tr
AaEamaSaaLocyaa va haMDyaat 5 maulao basalaolaI haotI.
AaEamaSaaLolaa kulaUp haoto.सगळ्या
pirsarat
sannaaTa haota.
saurvaatIlaa Aamhalaa Asao vaaTlao
kI hI maulao gaavaatlaI AsaavaIt.KoLt AsatIla.pNa maulao KoLthI navhtI , baarIk
caohro k$na basalaolaI.jaovha caaOkSaI kolaI tovha ivalaxaNa vaodnaa Jaalyaa.tI
maulao %yaaca AaEamaSaaLotlaI haotI.sauTI jarI laagalaI trI %yaaMnaa nyaayalaa
%yaaMcao palak Aalao navhto.%yaamauLo tI SaaLotca qaaMbalaI haotI pNa Bayaanak
gaaoYT hI haotI kI yaa 5 idvasaaMcyaa sauTIt AaEamaSaaLaMcao
mau#yaaQyaapkapasaUna iSapa[- svayaMpakI pya-Mt sava-jaNa inaGaUna gaolao
haoto.yaa maulaaMcyaa jaovaNaacaI rahNyaacaI kuNaIca kaLjaI GaotlaolaI navhtI.yaa
maulaaMnaa tsaoca vaa yaavar saaoDUna to sava-jaNa inaGaUna gaolao haoto.tI
maulao 2 idvasaaMpasaUna ]paSaI haotI.AamhI jar gaolaao nasatao tr puZohI AaNaKI
3 idvasa tI tSaIca rahIlaI AsatI.karNa yaa kaorkU samaajaatIla maulao hI [tkI
garIba Asatat kI yaa maulaaMkDo gaavaat jaavaUna kuNaalaa maagaNyaacao QaOya-
nasato AaiNa AaEamaSaaLa eka baajaUlaa %yaamauLo gaavaatlaohI kuNaIca Aalao
nasato..kdaicat vaa[-T baaolaU nayao.itqaoca ma$nahI pDlaI AsatI.
kQaI vaastva ho klpnaopoxaahI BaIYaNa Asato
yaacaI p`icatI AamhI Gaot haotao..mana ivaYaNNa Jaalao.SaovaTI जाताना jyaanao kulaUp
laavalao %yaacyaa ho manaatsauQda Aalao nasaola ka kI hI maulao Aata kaya
krtIla…माणसं इतकी क्रूर कशी होऊ शकतात ? हे समजण्यापलीकडचे होते..
maagacyaa
vaoLI BaoT idlaI tr yaaca आश्रमSaaLot 100
poxaa jaast tap Asalaolyaa maulaIlaa eka baMd KaolaIt Jaaopvalaolao haoto.मला
कन्हण्याचा आवाज आला म्हणून दार ढकलले तर ही मुलगी दिसली ..माझ्या शाळा आहे शिक्षण
नाही या पुस्तकात या आजारी झोपलेल्या मुलीचा मी फोटो मी टाकला आहे.त्याच शाळेत ६
वर्षांनंतर भेट दिल्यावर पुन्हा तीच अनास्था ...saMtap Anaavaar
Jaalaa…gaavakrI gaaoLa kolao…gaavaatca या आश्रम शाळेचा
ek
iSapa[- raht haota.लोकांनी %yaacao Gar
daKivalao.tao svat:cyaa Saotat gaolaa haota.%yaacyaa GarapuZo maaNasao
jamavalaI.मी खूप आवाज चढवला . KUp baDbaD
kolaI.खूप गर्दी जमली . tovha %yaacyaa
Garatlyaa laaokaMnaI jaa}na %yaa maulaaMnaa AaNalao.jaovaU Gaalaa mhTlaM tovha hao
mhNaalao…मुलांचा प्रश्न त्या दिवसापुरता सुटला...
prt inaGaalaao. mana saunna JaalaM..दुसर्या
दिवशी caja-na saraMnaI baatmyaa kolyaa.tovha yaa p`krNaacaI
caaOkSaI JaalaI AaiNa mau#yaaQyaapk inalaMibat Jaalao..pNa evaZyaa SaaLaMnaa
raoja BaoT Vayalaa evaZI maaNasaM kuzUna AaNaayacaI…प्रश्न
पुढे आणून पाठपुरावा कुणी करायचा ?
ho AaEamaSaaLaMmaQalao
vaastva Aaho ॰ malaa p`Sna pDlaa …. yaa ]paSaI 5 maulaaMnaI ka iSakavao..%yaa
AaEamaSaaLot ka qaaMbaavao…SaotkrIsauQda gaavaalaa jaatanaa janaavaracyaa
Gaasa paNyaacaI saaoya laavaUna jaatao pNa yaa maulaaMnaa tr janaavaraMcaohI Baagya %yaa SaaLot laaBalao
naahI.yaa AsaMvaodnaSaIla vat-NaUkInao maulao SaaLot iTkt नाहीत।
भर दुपारची वेळ.
रणरणत्या उन्हात आम्ही मेळघाटच्या त्या दुर्गम
आश्रम शाळेत पोहोचलोय...
मेळघाटातील सर्वात मोठी आश्रमशाळा ही मानली जाते.
मुले जेवायला बसली आहेत .समोर ताट मांडली आहेत.समोर
स्वयंपाक मांडलेला. स्वयंपाक म्हणजे काय तर एक भाजी आणि पोळ्या.पोळ्या अजून
वाढायच्यात पण मला मुलांची संख्या आणि समोर पोळ्यांची मांडलेली चवड यांचा काही
ताळमेळ च दिसेना.मी चटकन समोरच्या ४ पोरांना पोळ्या मोजायला सांगतो.पोरं असली काम
मोठ्या उत्साहाने करतात.
मी
विचारतो “किती” ?
पोरं म्हणतात ‘साहेब, ३४५ पोळ्या आहेत ‘
मी अधिक्षकांना विचारतो “आज किती मुलं हजर आहेत...”
अधिक्षक म्हणतात, “साहेब आजचा हजर पट आहे २४४”
मी भागाकर करतो. पोळ्या भागिले मुले .उत्तर येते
१.४१ .....
एका मुलाच्या वाट्याला फक्त दीड पोळीच येत होती.
समोर तरणीबांड आदिवासी १० वी तली पोरं बसली होती
..आशेन पोळ्या आणि भाजीच्या पातेल्याकडे बघत होती।
आणि त्यांच्या वाट्याला येणार होती फक्त दीड
पोळी....
--------------------------------------------------------------------------------------------------
गडचिरोली जिल्ह्यात कोर्ची तालुक्यातून जाताना एक
आश्रमशाळा लागली.
आश्रमशाळेच्या स्वयंपाक घराला लागून जेवणखोली नाही.
म्हणून पोरांनी स्वयंपाक घराबाहेर रांग लावायची आणि
ताट घेऊन आपल्या खोलीत जेवण न्यायचे .वाढप एकदाच होणार.
नेमकी पोरं ताटात जेवण घेवून जाताना आमच्यासमोर
चालली होती॰
उत्सुकतेने ताट बघितली.
फक्त भात आणि डाळ ताटात वाढलेली होती.
आणि पुन्हा मागायला यायचे नाही ही तंबी ........
एवढ्या भात वरणावर ती लेकर सारा दिवस काढणार होती ॰
मला तेव्हा माझ्या लहान
मुलाला सकाळपासून झोपेपर्यंत बळेच खाऊ घालणारी पत्नी आठवली आणि समोर दिसणारी ही
मुले....................
हेच
चित्र सारखे सारखे दिसायला लागल्यावर संतापलो...
एका आश्रम शाळेच्या अधिक्षकाला फैलावर घेतले .तुमची
घराची मुले ठेवाल का उपाशी? अस विचारले.
तो घाबरत म्हणाला ‘साहेब
आम्ही आपले हुकूमाचे ताबेदार...संस्थाचालक सामान खरेदी करून पाठवतात आणि त्यात
महिनाभर भागवावे लागते .जर काही संपले असं कळवल तर फोनवर शिव्या ऐकाव्या लागतात...
खाजगी आश्रमशाळेत भ्रष्टाचार आणि सरकारी आश्रमशाळेत
साहित्य असते पण आळस...परिणाम उपाशी लेकऱ...
..............................................................................................................
यवतमाळ जिल्ह्यात एका आश्रम शाळेजवळून जाताना
सोबतचे अधिकारी सांगत होते.
सर, या आश्रम शाळेत
१० वीला शिकवायला इंग्रजीचा शिक्षक नव्हता म्हणून गावकर्यांनी व पालकांनी आंदोलन
केले.तेव्हा कुठे जानेवारीत शिक्षक मिळाला आणि दोन महिन्यात पोरांनी परीक्षा
दिल्या॰
मी विचारले” का बर ? ..शिक्षक
भरती केली नाही का ?”
ते म्हणाले ”मुळातच ही भरती पैसे घेऊन केली जाते..सगळा
फार्स होतो .अगदी लेखी तोंडी परीक्षा होते पण पेपर बदलले जातात.थेट मंत्र्यापर्यंत
पैसे असतात .अशा वेळी कोण कशाला विषयानुसार शिक्षक भरील..? अशावेळी इंग्रजी गणिताचे शिक्षक कमी असतात व त्यांची मग शिक्षकांची पळवापळ्वी
होते .जिथून दडपण तिथे त्यांची बदली होते..”
“पण मग जानेवारीत शिक्षक येवून मुले पास झाली का ?” मी बावळटसारखा प्रश्न विचारला॰
ते हसून म्हणाले “निकाल
१०० टक्के लागला ...कारण निकाल हा मास कॉपी वर अवलंबून असतो शिकवण्यावर नाही ........”
ज्या ज्या आश्रमशाळेत गेलो .तिथे तिथे आम्ही
चाचण्या घ्यायचो. अत्यंत विदारक अवस्था .
नेहमीप्रमाणे मी जोडाक्षरे लिहायला द्यायचो ।
अपवादाने शब्द बरोबर यायचे.
अनेक आश्रमशाळा तील उत्तरपत्रिका माझ्याकडे अजून
आहेत.
सर्वात शहारलो ते एका उत्तराने ......
वजाबाकी दिली होती ५११ -४९९.
वर्ग दहावीचा होता .
५११ ही संख्या १०वीच्या मुलाने लिहिली ५००११ .
अर्थात हे प्रातिनिधिक
चित्र नसले तरी घसरणीचा अंदाज यावा.
शैक्षणिक प्रगति मुलांची का होत नसावी .....?
१ ली ते ४ थी च्या वर्गाचा आढावा घेतला तर शिक्षक च
नेमलेले नसायचे.
रोजंदारीवर शिक्षक नेमले जाणार.अत्यल्प पैशात
नेमलेले हे शिक्षक परवडत नसल्याने सोडून जाणार .जबाबदारी कोणावरच नाही.
आश्रमशाळा अध्यापन बघायची जबाबदारी कोणावर असते ?
मुख्याध्यापकावर .
पण मुख्याध्यापक त्यांच्यातलाच.त्यांच्यात राहणारा
.वयाच्या ज्येष्ठतेने नेमलेला .तो कशाला कुणाशी वाईट पणा घेईल ...आणि जर घेतलाच
अन्नधान्य खरेदयातला भ्रष्टाचार सहकार्यांनी बघितलेला .तेव्हा सहकारी ही फार ऐकून
घेत नाहीत.
केन्द्र्प्रमुख असतात पण त्यांची संख्या कमी आणि
एका एका आश्रमशाळेतली अंतरे खूपच.
त्या सर्वांचा प्रमुख असतो प्रकल्प अधिकारी .तर
त्याच्याकडच्या ५० विषयातला एक विषय आश्रमशाळा.
बाकी आदिवासींना शेतीची अवजारे देणे, वस्तु कर्ज, धान्यपुरवठा,
सिंचन, सामुदायिक लग्न, सततच्या मीटिंग, विकास आराखडा हे सारे मोठ्या आर्थिक तरतुदींचे विषय त्यांना बघावे लागतात
व त्यातील मोठ्या तरतुदी मुले त्यातच त्यांना रस असतो ..त्यात आश्रमशाळेतील
मुलांना लिहिता वाचता येते का ..शिक्षणाचा दर्जा हे विषय तर खूपच दूर...
ही झाली खालची अवस्था वर तरी शिक्षण कोण बघतय .
आदिवासी विभागाच्या १००० आश्रमशाळा असूनसुद्धा या
शाळांना शिक्षण विभाग च नसतो. शिक्षण विभागातून अधिकारी प्रतिनियुक्तीवर घेतले
जातात आणि ते इथे रमत नाहीत पुन्हा सोडून जातात.
अशी शिक्षणाची अवस्था.
मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना विधिमंडळात ही
गाजल्या .
शासनाने महिला आमदारांची समिती नेमली .त्या समितीने
अनेक शाळांना भेटी देवून शिफारसी केल्या .
मद्यपी कर्मचारी किंवा एखादा विकृत शिक्षक
यांच्याकडुन काही अत्याचारच्या घटना घडतात .हे प्रमाण खूप कमी असले तरी महाराष्ट्र
भर अशी प्रकरणे गाजतात .
....मी एका कार्यकर्त्याला विचारलं ... “याचा
परिणाम काय होतो”.
तो थंडपणे म्हणाला “अत्याचार
झालेली मुलगी ज्या गावाची किंवा परिसरातील असते , त्या
भागातील पालक आपल्या मुली आश्रमशाळेतून काढून घेतात आणि नंतर अनेक वर्षे
आश्रमशाळेत मुली शिकायलाच पाठविल्या जात नाही ....ऐकताना शहारल्यासारखे झाले “
एका मूर्खपणाची किंमत अनेक
वर्षे मुलींना मोजावी लागते.
आश्रमशाळा आणि भ्रष्टाचार
हे समानार्थी शब्द समजावेत का ...?
आपण मुख्याध्यापक यांच्या
भ्रष्टाचाराची चर्चा जरूर करू...
पण मोठे मोठे
भ्रष्टाचार उघड होत नाहीत.
या मुलांच्या करुणेने मंत्रालय नेहमीच कार्यप्रवण
होते आणि एका शाळेला खरेदीचा त्रास ते देत नाही तर सर्व राज्याची खरेदी एकदम करून
टाकतात !!!.या मुलांना स्वेटर बूट चादरी
ड्रेस खेळण्याचा ड्रेस अशा सर्व वस्तु मुंबईतच खरेदी होतात ..गडचिरोली मेळ्घाट
मधील मुलांच्या थंडीची काळजी मुंबईत घेतली जाते हे बघून कुणीही भारावून
जाईल..केंद्रीकृत खरेदी करायची आणि खाली पाठवायची एवढाच एक उद्योग सुरू असतो
पुन्हा या वस्तूंचा दर्जा काय असतो हे विधिमंडळाच्या अधिवेशनात आपण बघतोच आहोत ..
शेकडो
शाळांना solar
system दिली गेली आहे .लाखो रुपयांची खरेदी.अनेक ठिकाणी solar
बंद.तक्रार कुठे करायची......?
मंत्रालय जर इतके पुढे तर
मग खालचे अधिकारी कशाला मागे राहतील..?
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एका आश्रमशाळेत मी उभा....... .भाजीपाला बघतोय .
रोज एकच भाजी का मुलांना खाऊ घालता .तुम्ही स्वत;च्या घरी तरी रोज एकच भाजी खाल का ?
अधिक्षक खाली मान घालून उभे .हळू आवाजात म्हणतात “
काय करणार साहेब ?.ठेकेदार रोज त्याच भाज्या देतात
आम्ही तरी काय करणार ?“
“मग ठेकदारांना बोलत का नाही..?”
“साहेब कसं बोलणार? ..ते
आमदारांचे कार्यकर्ते आहेत .माझी बदली करून टाकतील साहेब . दोन जिल्हे ओलांडुन
बदली झाली तर मी काय करणार ?”
तिथली स्वयंपाक करणारी बाई म्हणाली “बरं भाजी एकच का देना. पण ती ही खराब
शिळी असते .”
आणि हसून म्हणाली “मार्केट यार्डाचा भाव आम्हाला
इथे जंगलात रोज कळतो”
मला कळेना.
ती म्हणाली” सर्वात जी भाजी स्वस्त असते तीच फक्त
इथे आणली जाते “
“.महाग
भाज्या आमच्या मुलांना कधीच खायला मिळत नाही”
इतके छोटे छोटे
शोषण सुरू असते आणि विधिमंडळात बजेट मध्ये आदिवासी विभागाचे बजेट वाढविले की
तज्ञांनी त्याचे स्वागत करायचे की आदिवासींचे जीवनमान उंचवणार म्हणून ......बजेट वाढविणे आणि योजना राबविणे या .या
सार्या आदिवासी विकास नव्हे तर ठेकेदार विकास योजना आहेत॰
आश्रमशाळांना माल पुरवायला ठेकदार नेमले जातात.. ते
सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असावेत अशी शासकीय अट नियमात आहे का असा संशय यावा
इतपत त्यांची संख्या मोठी असते. भाजीपाला अंडी मांसाहार गोड पदार्थ फळे धान्य दूध
या सर्वांसाठी ठेकेदार नेमलेला असतो .तो प्रत्येक ठेकेदार अपवाद वगळता दर्जा
घसरवून नफा कमावतो. दर्जा द्यायचा तर मग राजकीय संबधांचा उपयोग तरी काय असा
त्यांचा सरळ प्रश्न असतो..मुख्याध्यापकांना एकतर ते भ्रष्टाचारात सामील करून घेतात
आणि जर सामील झाले नाही तर त्यांना राजकीय संबधांची भीती दाखवत
राहतात.मुख्याध्यापक व अधिक्षक गप्प बसून घेतात.बर्याचदा या आपल्या ठेकदार बनलेल्या
कार्यकर्त्यांनी मांडलेला हा दमदाटीचा भ्रष्टाचार त्या राजकीय नेत्यांना तपशिलात
माहीत ही नसतो पण ते दमदाटी करत राहतात.
यात मुख्याध्यापकांना अधिक्षकांना भ्रष्टाचारात सामील करणे अस्वस्थ करणारे
असते. थेट मुलांच्या भुकेशी तडजोड केली जाते.. मुलांना समजा महिन्यातून दोन वेळा
मांसाहार द्यावा असा आदेश असतो. हे ठेकेदार मुख्याध्यापकांशी संगनमत करून फक्त
एकदाच मांसाहार देतात आणि दोन वेळा दिल्याचे बिल काढून मुख्याध्यापकांना थोडे पैसे
देतात किंवा २५ किलो मांस दाखवायचे आणि १० किलोच द्यायचे .वरची रक्कम वाटून
घ्यायची.. विषय दोघातच असतो त्यामुळे चर्चाही होत नाही.
न्यायालयाचा कडक आदेश सुद्धा
भ्रष्टाचारासाठी वापरला जातो. मध्यंतरी न्यायालयाने सुमोटो केस दाखल केली आणि
आश्रमशाळेच्या तपासणीसाठी कोर्टानेच पथके नेमली. मी सुद्धा खूप सूचना उत्साहाने
केल्या होत्या . तेवढ्या काही दिवसात आश्रमशाळा एकदम दर्जेदार झाल्या. न्यायालयाने
अनेक निर्देश दिले .मुलांना दूध फळांपासून जेवायला काय द्यावे इथपर्यंत सूचना
दिल्या .आदिवासी विभागाने त्याची कडक अमलबजावणी सुरू केली आणि बघता बघता
आश्रमशाळेतल्या मुलांना दूध आणि फळे मिळू लागली........... फक्त तपशिलात थोडा फरक
होता .... कागदावर आणि प्रत्यक्षात आकड्यांचा फरक केला . न्यायालय म्हणाले होते की
मुलांना रोज एक सफरचंद रोज केळी आणि रोज एक अंडे द्या ..ठेकेदारांनी आणि
मुख्याध्यापक यांनी फक्त फळांची नावे तीच ठेवून संख्या फक्त बदलली .म्हणजे असे की
रोज सफरचंद,केळी आणि अंडे अशा तीनही वस्तु द्यायच्या आहेत ना
..त्यांनी तिन्ही वस्तु रोज देण्याइतके बिल सादर केले आणि प्रत्यक्षात आठवड्यात आज
फक्त सफरचंद,उद्या
फक्त अंडे आणि परवा फक्त केळी असे दिले म्हणजे एक वस्तु आठवड्यात दोन वेळाच द्यायची
आणि बिल मात्र संपूर्ण आठवड्याचे काढायचे असे केले जाते..आता तुम्ही म्हणाल की हे
लक्षात येत नाही का ? एक तर सर्वांना भ्रष्टाचारात सामील
करून घेण्याचा पॅटर्न असतो आणि समजा कुणीही अधिकारी आले तर ते विचारतात की मुलांनो
तुम्हाला अंडी सफरचंद केळी मिळाली का ..तर मिळत असल्याने ते हो म्हणतात ..किती
दिवसांनी हा उपप्रश्न कुणीच विचारत नाही ..तो न विचारण्याची किंमत दिली जाते....!
.या मानसिकतेपुढे इथे
न्यायालय तरी काय करेल ...?
मुख्याध्यापक भ्रष्ट
झाल्यास त्याचा फटका शाळेच्या गुणवत्तेला बसतो .तुम्ही म्हणाल कसे ?
भ्रष्ट मुख्याध्यापकला कर्मचारी बघत असतात
.त्यामुळे तो त्यांना शैक्षणिकदृष्टया फारसे बोलू शकत नाही. त्याचे नीतीधैर्य च
खच्ची होते हा यातला सर्वात गंभीर परिणाम आहे .
आश्रम शाळांची ही काळी बाजू आहेच पण आश्रम
शाळांच्या काही समस्याही लक्षात घ्याव्यात अशा आहेत. सर्वात महत्वाचे हे की सरकारी
अधिकारी संस्थाचालक यांचे आणि हाताखालच्या आश्रमशाळा कर्मचारी यांचे संबध अजिबात
प्रेमाचे नाहीत .एकप्रकारे दहशत जाणवते व कर्मचार्यात एक तीव्र न्युंनगंड जाणवतो
.आत्मविश्वास अजिबात अपवाद वगळता जाणवत नाही. सरकारी आश्रमशाळेत तर बदलीची भीती
असते.दुसर्या जिल्ह्यात बदलीची भीती घातली जाते .बदली या नावाखाली खूप भ्रष्टाचार
होतो.शिक्षक भरती त तर खुले टेंडर जाहीर व्हावे तसे पैसे मागून जागा भरल्या जातात.
मध्यंतरी ८ लाख रुपये रेट होता. लेखी परीक्षा होतात पण त्याचे पेपर सुद्धा बदलले
जातात अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आश्रमशाळेची कार्यसंस्कृतीच नष्ट झाली आहे.
सगळीकडे एक तर पैशाचा वापर किंवा दहशत.खाजगी संस्थेत नातेवाईक भरलेले .त्यांना
कामाला कसे लावायचे ही मुख्याध्यापकापुढची समस्या. अनेक ठिकाणी कर्मचारी शहरात
राहणार .त्यामुळे जाणे येणे गैर हजेरी या समस्या आहेत. मुले मोठी झाल्यावर कर्मचारी
मुलांच्या शिक्षणासाठी शहरात राहतात. कुटुंबिय इतक्या दुर्गम ठिकाणी सुविधा
नसल्याने राहायला तयार नसतात .अर्थात हा मुद्दा सर्वच शासकीय विभागांना लागू आहे
स्वतंत्र्य शिक्षण विभाग नसल्याने आदिवासी विभागाला शिक्षण विभागाकडून
अधिकारी घ्यावे लागतात. पर्यवेक्षीय अधिकारी संख्येने खूप कमी असतात व आश्रम
शाळांची अंतरे आणि पुन्हा त्यांची इच्छा शक्ती हे बघता ते फारसे फिरत नाहीत.पुन्हा
मुख्य कार्यालयातच त्यांना सतत कामे दिली जातात .याचा परिणाम गुणवत्तेवर होतो आणि
काम बघितले च जात नाही याचा परिणाम सर्वत्र शैथिल्य आले आहे.
या
भ्रष्ट अधिकारशाही व पर्यवेक्षण होत नसलेल्या वातावरणात चांगले काम करणारे शिक्षक
कुणी दखल घेत नाही म्हणून निराश होतात व नकळत इतरासारखे बनून जातात .अनेक आश्रम
शाळेत वर्ग बघितल्यावर त्या शिक्षकांचे कौतुक केले तेव्हा ते भारावून जायचे.असे
कधीच कुणी काम बघत नाही असे म्हणायचे. काही आश्रम शाळेत तर इंग्रजी चे काम खूप
चांगले आहे.काही खाजगी संस्थाच्या सेवाभावी वृत्तीने चालविल्या जाणार्या आश्रमशाळा
खूप चांगल्या आहेत.मधल्या काळात सरकारने सर्व शाळांना प्रोजेक्टर दिला...त्याचा
वापर काही शाळांनी खूप चांगला करून घेतला आहे.काही शिक्षक या वातावरणा चा स्वत: वर
काहीच परिणाम होऊ न देता निष्ठेने काम करत राहतात. काही शिक्षकांनी वनौषधीच्या
बागा बनविल्यात.काही शाळामध्ये तर चित्रकला,वारली पेंटिंग
संगीत वाद्य यावर खूप चांगले काम आहे .मुलांच्या क्रीडा प्रकारातील नैसर्गिक
क्षमता योग्य रीतीने वापरुन घेणारे शिक्षक व शाळा ही आहेत.
काही शाळेत अधिक्षक हे पद खूप
चांगले काम करतात पण त्याही काहीच नोंद नसते. रोज दोन्ही वेळा मुलांना जेवायला
घालायचे.गॅस पासून तर भाजीपासुन सगळे जमवून आणायचे आणि आलेला अधिकारी संशयाने
बघणार....पाठ मात्र कुणीच थोपटणार नाही.अनेकजण थेट पैशाची अपेक्षा करणार.काही
अधिक्षक दिवसरात्र काम करतात .थोडे जरी कौतुक केले तरी भरून पावतात .या
अधिक्षकांच्याही समस्या असतात .मुले आजारी पडल्यावर त्यांना दवाखान्यात हलवावे
लागते. सर्पदंशाच्या केसमध्ये खाजगी दवाखान्यात खूप बिल होते .अनेकदा ते मंजूर
व्हायला त्यासाठी कार्यालयात खेटा माराव्या लागतात. पावसाळ्यात धान्य दळून मिळत
नाही. भाज्या पोहोचत नाहीत. वीजपुरवठा खंडित होतो अशावेळी खूपच तारांबळ होते.रोज
३०० मुलांचे दोन वेळचे जेवण म्हणजे एखाद्या लग्नाचा स्वयंपाक करावा तसेच असते..
लग्नातली आपली तारांबळ व तणाव अधिक्षक रोज अनुभवत असतो .यातून ते खूप चिडचिडे
होतात.त्यात जर भ्रष्ट असतील तर स्वभाव विचित्र होतो व अधिकच मारकुटे होतात. मला
नेहमी असे वाटते की साने गुरुजींनी वसतिगृहातील मुलांशी किती प्रेमाने वागता येऊ
शकते हे दाखवून दिले आहे..त्या भूमिकेतून अधिक्षकांची अशी प्रशिक्षणे व्हायला हवीत
.त्यांना अधिक संवेदनशील व पालकांच्या भूमिकेत न्यायला हवे आहे
यातला एक अनुभव मी
घेतला.गाडगेबाबा मिशन चे अध्यक्ष मधुसूदन मोहिते माझे मित्र.त्यांनी सर्व आश्रम
शाळा मुख्याध्यापक अधिक्षक यांचे प्रशिक्षण आयोजित केले.त्यात मी हा प्रेमाने मुले
हाताळण्यावर बोललो आणि शिक्षण नेमके कशाला म्हणायचे हे सांगून प्रयोगशीलतेची चर्चा
केली.त्यानंतर अनेक मुख्याध्यापका चा दृष्टिकोन च बदलला असे अनेकांनी सागीतले. हे सर्वत्र
करायला हवे.
आदिवासी भटके विमुक्त यांच्यासाठीच्या वंचित
वर्गाच्या या शाळा मध्ये काम करण्यासाठी कर्मचारी हा कार्यकर्ता मनाचा व्हायला हवा
आहे. त्याला त्या मुलांची सामाजिक पार्श्वभूमी माहीत व्हायला हवी. त्या समाजाचे
प्रश्न माहीत व्हावेत. त्यातून त्या मुलांविषयीचे आकलन उंचवायला मदत होईल व शिक्षक, अधिक्षक,कर्मचारी त्या मुलांशी अधिक संवेदनशीलतेने
वागतील.या मुलामध्ये आक्रमकता असते.ती उपद्रवी असतात पण हे समजून घ्यायला हे आकलन
उपयोगी पडते. ‘टू सर वीथ लव्ह’ या
पुस्तकातला शिक्षक झोपडपट्टीतल्या शाळेत मुलांच्या शिक्षेबाबत म्हणतो की ही मुले
अशी वागतात याचे कारण त्यांचे पालक तसे आहेत आणि पालक तसे वागतात कारण ते या
व्यवस्थेच्या शोषणाचे बळी आहेत.तेव्हा मला जर शिक्षा च करायची असेल तर या
व्यवस्थेला करावी लागेल:या मुलांना नाही ‘’या पातळीवर या
यंत्रणेचे आकलन उंचवावे लागेल.
यालाच जोडून आणखी एक
मुद्दा हा आदिवासी आणि भटक्यातील मध्यमवर्गाचा आहे .या आश्रमशाळेत काम करणारा या
जमातीतील कर्मचारी वर्ग आहे.परंतु तरी मध्यमवर्गात सरकल्यावर त्यातले अनेक जण
कर्मचारी मानसिकतेत जातात आणि आपल्या च बांधवांची सेवा करायची या भूमिकेतून
नोकरीकडे बघत नाही.हा मुद्दा आज इतका सार्वत्रिक आहे की शेतकरी कुटुंबातील,आदिवासी ,भटके यातून निर्माण झालेला मध्यमवर्ग च आज
महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात कर्मचारी म्हणून सर्वच शासकीय विभागात
काम करतो आहे पण आपण सेवांचा दर्जा अनुभवतो आहेच.माणसांचे वर्ग बदलले की भावविश्व
च बदलते हे कसे समजावून घ्यायचे.? शरद जोशी म्हणतात
त्याप्रमाणे माणसाचे विचार करण्याचे इंद्रिय हे मेंदू नसून खिसा आहे हेच
दुर्दैवाने खरे आहे. तेव्हा आजच्या शिक्षणातून या बांधिलकीची लस कशी टोचायची ही
माझी चिंता आहे. त्याचप्रमाणे आश्रमशाळेतून शिकून नोकरी लागलेले त्या आश्रमशाळेत
पुन्हा फारसे येत नाहीत .ते का येत नाही याचाही अभ्यास करायला हवा . ते आश्रमशाळेतील
गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत नाहीत.हा अनुभव सर्वच सेवाभावी संस्थांना
येतो. लाओत्से म्हणतो त्याप्रमाणे माणसाला उपकाराच्या खुणा लवकर पुसून टाकायच्या
असतात हेच सत्य असते का ?पण या माजी विद्यार्थ्यांची शक्ती
वापरण्याबाबत ही विचार करायला हवा.
दूसरा मुद्दा शिक्षकांबद्दल ही
जाणवतो .आमच्या तालुक्यातील आश्रमशाळा शिक्षकासमोर एकदा दीर्घ व्याख्यान दिले आणि त्यात आदिवासी जमाती
त्यांची संस्कृती त्याचा शिक्षणात कसा वापर करता येईल यावर बोललो तर ते शिक्षक
इतके खुश झाले की अजून एक व्याख्यान त्यांनी मागून घेतले.तेव्हा मला असे जाणवले की
आश्रमशाळा शिक्षकांना या मुलांचे वेगळेपण या मुलांच्या समस्या संस्कृती हे सारे
समजून सांगायला हवे आहे.
आदिवासी
शिक्षणावर काम केलेले दिवंगत दत्ताभाऊ सावळे यांनी दामखिंड येथील लिहिलेला प्रसंग
मला खूपच भावतो . दत्ताभाऊ नी ठाणे
जिल्ह्यात एक शाळा काढली.मुलांना बाराखडी येईना ,मुले नीट शाळेत बसेनात. ते वैतागले .एकदा मुलांची सहल जंगलात काढली.मुले
एकदम हरखून गेली .डोंगर चढताना दत्ताभाऊ अडखळत होते .पाय सटकत होते आणि मुले मात्र
त्यांना विविध झाडांची नावे सांगत होती आणि पुन्हा पुन्हा विचारीत होती..दत्ताभाऊ
वैतागले.तेव्हा झाडावर चढलेला झिपर नावाचा एक मुलगा त्यांना
म्हणाला “ मास्तर आमचं बी असच होतं वर्गात ग,म,भ,न, शिकताना .....” मला हा
प्रसंग विलक्षण भावतो. या मुलांना जे येते त्याचा आधार घेऊन जोपर्यंत आपण त्यांना
शिकवत नाही तोपर्यंत आश्रम शाळा प्रभावी होणार नाहीत व गळती ही थांबणार नाही.
त्याचप्रमाणे
या मुलाशी जीवनकौशल्यांविषयी बोलायला हवे.त्यांच्या जगण्याविषयी प्रश्नाविषयी
बोलायला हवे. दत्ता सावळे या आदिवासी मुलांशी त्यांच्या शोषणाविषयी बोलायचे.एकदा
ते मुलांना विचारतात बाजारात गेल्यावर मुलांनी काय काय खरेदी केले ?मुले वस्तुंची नावे सांगतात.मग ते विचारतात की त्या वस्तूंचा भाव कोणी
ठरवला .मुले म्हणतात दुकानदारांनी ...नंतर ते त्या मुलांना विचारतात की त्या मुलांचे
वडील कोणत्या वस्तु विकतात...?. तेव्हा मुले भात ,मध ,लाकडे अशी विकलेल्या वस्तुंची नावे सांगतात
.पुन्हा ते विचारतात की विकलेल्या वस्तुंची किमत कोणी ठरवली ? मुले म्हणतात की दुकानदाराने.....
आणि मुलांच्या लख्खपणे लक्षात येते की आपण काही
विकायला गेलो तरी किमत तेच ठरवतात आणि काही खरेदी केली तरी किमत तेच ठरवतात आणि
त्यांना शोषण समजायला सुरुवात होते.. दत्ता सावळेंचे भाष्य मोठे भेदक आहे की
आदिवासींचे शोषण म्हणजे करवतीने लाकूड कापण्यासारखे ...करवत पुढे जाताना ही कापते
आणि करवट मागे जातानाही कापते ....या पातळीवर जर आश्रमशाळेत संवाद झाले तर आदिवासी
शिक्षणात वेगळेच काही घडू शकेल. पावलो फ्रियरी ने शिक्षणाकडून नेमकी हीच अपेक्षा
व्यक्त केली होती.
आश्रमशाळेची गळती ही खूप
मोठी समस्या आहे .मोठ्या संखेने मुले शाळा सोडतात ही गळती रोखायला या मुलांच्या
जीवनशैली चा परंपरेचा वापर शिक्षणात करून घ्यायला हवा. अर्थात आदिवासींसाठी वेगळा
अभ्यासक्रमा मला मान्य नाही कारण उच्च शिक्षणात सर्वांना एकच अभ्यासक्रम आहे
.तेव्हा हाच अभ्यासक्रम शिकविणे योग्य आहे.शिकवण्यातून, सहशालेय उपक्रमातून हे घडवायला हवे. आश्रमशाळेच्या रविवार दुपारचा वेळ
पूर्ण मोकळा असतो .त्याचा असा काही वापर करायला हवा .त्यात यातील चित्रकार मुले
गाणी म्हणणारी वाद्य वाजविणारी मुले यांना प्रशिक्षित करायला हवे.त्याचवेळी ज्या मुलांना
क्रीडा क्षेत्रात गती आहे .त्याना पुढे न्यायला हवे .वनौषधी जमविणे,या मुलांच्या घरात म्हटली जाणारी गाणी ,जुन्या
लोककथा ,जमातीचा इतिहास या मुलांच्या माध्यामातून संकलित
करायला हवा.नक्कीच या मुलांना शाळेची गोडी वाढेल.
महाराष्ट्रात आश्रमशाळा या दोन प्रकारच्या
आहेत.एक आदिवासी मुलांसाठी चालविल्या जाणार्या आदिवासी विभागाच्या आणि दुसर्या
समाजकल्याण विभाग चालवितो त्या. अनेकदा हे माहीत नसते. आदिवासी आश्रमशाळा अनेक
कारणांनी गाजतात त्यामुळे त्या जास्त माहीत आहेत. समाजकल्याण विभागाच्या
आश्रमशाळेत प्रामुख्याने भटके विमुक्त मुले असतात. बाकी रचना, सरकारी व खाजगी भ्रष्टाचाराचा मुद्दा ,जेवणाचा
दर्जा ,शिक्षणाची अवस्था हे सर्व प्रश्न जवळपास दोन्ही
प्रकारच्या आश्रमशाळेत सारखेच आहेत.फक्त फरक जागेचा असतो. आदिवासी आश्रम शाळा या
दुर्गम भागात तर समाजकल्याण आश्रमशाळा या कमी दुर्गम नागरी भागात आहेत.त्यामुळे
नैसर्गिक अडथळे कमी आहेत.
महाराष्ट्रात सर्वात दुर्लक्षित
शालाबाहय समस्या ही भटके विमुक्तांची आहे .त्यांचे अजून प्रश्न च माहीत नाही तर
उत्तरे अजून दूरच .बाळकृष्ण रेणके यांच्या आयोगाने भटक्यांची आर्थिक सामाजिक
शैक्षणिक विदारक स्थिति पुढे आणली . एकूण ४७ प्रमुख जातीत आजही मसणजोगी छप्परबंद
गोपाळ डोंबारी यासारख्या अनेक जातीत शिक्षण अत्यंत कमी आहे . भटक्या विमुक्तांची नेमकी राज्यात संख्या किती
याचा सांख्यिकी माहिती सुद्धा नक्की नाही यावरून समस्या लक्षात यावी.
भटके विमुक्त प्रतिष्ठान यमगरवाडी यांनी ३८००० भटक्या
कुटुंबांचा ३१ जमातीचा ७ जिल्ह्यात सर्व्हे केला . त्यात ४७ टक्के मुले कधीच शाळेत
न गेलेली आढळली तर महाविद्यालयीन शिक्षण घेताना मुले अपवादानेच आढळली. मुलींच्या
शिक्षणाची स्थिति तर खूपच वाईट आढळली.
भटक्यांसाठीच्या आश्रमशाळा चा syscom संस्थेने माहिती अधिकारात अभ्यास केला तेव्हा त्यातल्या
पुढारलेल्या जातींचीच मुले फक्त या शाळामध्ये दिसतात.भटक्याममधील मसणजोगी छप्परबंद
गोपाळ डोंबारी यासारख्या उपेक्षित जातींची
मुले आश्रमशाळेत दिसत नाहीत. तेव्हा ती
मुले या प्रवाहात कशी येतील हा खरा मुद्दा आहे . त्यासाठी अशा जाती नक्की करून
त्या जमातीची मुले विशिष्ट संख्येने आश्रमशाळेत
असल्याशिवाय पटपडताळणी होणार नाही असा नियम करण्याची गरज आहे . हे जर केले
तर आश्रमशाळा ही मुले दाखल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतील अन्यथा या
जमातीच्या शिक्षणाचा प्रश्न तसाच राहील.आश्रमशाळेत नापास मुलांना प्रवेश दिला जात नाही . त्यामुळे
मोठ्या संख्येने ९वी १०वी ची मुले गळती होतात. त्यामुळे नापास मुलांना आश्रमशाळेत
प्रवेश असलाच पाहिजे. आश्रमशाळेत १२० ची मर्यादा असल्याने अनेक पालकांची मुलांना प्रवेश मिळत नाही अशी तक्रार असते .
तेव्हा खात्री करून प्रवेश मर्यादा वाढवावी.भटकी मुले आश्रम शाळेतून गळती होण्याचे
प्रमाण मोठे आहे. पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करताना मुलांचा वापर भिक्षेकरी
कायद्यान्वये कठोरपणे करण्याची गरज आहे. जिथे भटक्यांच्या यात्रा भरतात तेथे
बालविवाहबाबत पथनाट्य व इतर मार्गाने प्रबोधन करण्याची गरज आहे याचे कारण आजही
मोठ्या संख्येने बलविवाह होतात. या मुलांमधील इतर कौशल्ये बघता या मुलांना क्रीडा
अकादमी त सामावून घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा. भटक्या समाजातील मुले थेट शाळेत
जात नाहीत . तेव्हा पालावरची शाळा हा उपक्रम भटके विमुक्त प्रतिष्ठान यांनी केला.पालात
अनौपचारिक शाळा सुरू केल्या . त्यात मुलांना शाळेची गोडी लागली आणि मग त्यांना
दाखल केले या उपक्रमाचा अभ्यास करण्याची गरज आहे.
.gaDicaraolaI
ijalhyaat naxalavaaVaMmauLo AaEamaSaaLaMpuZcao p`Sna AiQakca gaMBaIr
Aahot.naxalavaad yaa samasyaocao AByaasak p~kar dovaoMd` gaavaMDo सांगतात
की C%tIsagaDmaQyao jasao AaEamaSaaLaMcao sqalaaMtr kolao
tSaa AaEamaSaaLa ibagar naxalavaadI ivaBaagaat iSaFT krayalaa
hvyaat.naxalavaadacaa AaEamaSaaLovar kaya pirNaama haotao ho saaMgatanaa
dovaoMd` gaavaMDo saaMgatat kI AaEamaSaaLot naxalavaadI yaotat.gaaNaI
mhNaayalaa laavatat.p`jaasa%tak idnaalaa kaLa JaoMDa laavatat.ekacavaoLI 250
maulaaMcyaa manaavar pirNaama haotao.AaEamaSaaLot yaovaUna jaovatat.%yaaMcao
laxa huYaar maulaaMkDo ivaSaoYak$na Asato.to huYaar maulaaMnaa hortat va %yaa
maulaaMnaa sa@tInao naxalavaadI k^MmPmaQyao GaovaUna jaatat.naxalavaaVaMkDUna
bacaava krNyaasaazI iSaxak huYaar maulaaMnaa pLvaUna SahrI Baagaat
naotat.naxalavaaVaMcyaa laxaat hI maulao yaovaU nayao yaasaazI iSaxak p`ya%na
krtat. naxalavaaVaMnaa kMTaLUna gaDicaraolaIt sqalaaMtracao p`maaNa savaa-t
jaast Aaho.3 rI 4 qaIt gaLtI JaalaolaI maulao BaItInao gaavaat raht naahIत.SaaLotUna
gaLtI Jaalaolyaa maulaaMnaa naxalavaaVaMcaa Qaaoka savaa-t jaast Asatao.palak
%yaaMnaa raojagaarasaazI ijalhyaabaahor pazvaUna dotat.Aa[- vaDIla %yaa maulaaMcao p%to saaMgat naahIt.
आश्रम शाळेच्या या भ्रष्ट दृष्टचक्रात जो कोणी
हस्तक्षेप करील त्याला काहीही सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल अशी स्थिति आहे.मी
त्यातले माझे दोन तीन अनुभव नोंदवितो.एकतर
कडक अधिकारी आला की त्याला सरळ आमिष दाखविणे किंवा दमदाटी करणे हेच दोन पर्याय
असतात॰
चंद्रपूर जिल्ह्यात आश्रम शाळांना भेट दिली आणि
त्या शाळेत खूप दोष काढले.सोबतच्या अधिकार्यांनी नोटिसा दिल्या.दुसर्या दिवशी
गेस्ट हाऊस बाहेर गाडीत बसताना आमच्या ड्रायव्हर ला त्या आश्रमशाळेच्या शिपायाने
बाजूला बोलाविले. तो ड्रायव्हर च्या एक पाकीट हातात देत होता आणि ड्रायवर नकारार्थी
हावभाव करत होता .गाडीत बसल्यावर नंतर त्याने सांगितले की त्या शाळेचा शिपाई पाच
हजारचे पाकीट घेऊन आला होता.त्यांची ती पद्धत च होती.इतका तो सर्वांच्या अंगवळणी
पडलेला व्यवहार होता. ड्रायव्हर ने माझा अवतार दोन दिवसात बघितला असल्याने त्याने
परस्पर त्याला नाही सांगून टाकले होते.मला हसूही आले आणि हे सारे किती राजरोस चालते
हे ही लक्षात आले .शाळांची एकतर तपासणी च करायची नाही आणि केली तर कडक कारवाई
यासाठी करायची की त्यातून उत्पन्न मिळाले पाहिजे.तेव्हा एखाद्याने कडक तपासणी केली
की होणार काहीच नाही फक्त थोडा खर्च करावा लागेल इतकाच अर्थ शाळांनी घेतला होता.
हे अधिक क्लेशदायक होते
हा अनुभव किमान सुसह्य तरी होता.आपण भ्रष्टाचार करत नाही हा अहंकार
सुखावणारा होता पण दुसरे दोन अनुभव अंगावर येणारे होते
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नांदेड जिल्ह्यातली अशीच एक आश्रमशाळा.
रस्त्यावरून जाताना दिसली. समाजकल्याण विभागाच्या
अंतर्गत खाजगी आश्रमशाळा होती.. समोरच स्वयंपाकघर होते . सहज म्हणून
गेलो.दुपारच्या जेवणात दिलेली एक पोळी तिथे पडलेली होती .ती बघितल्यावर धक्काच
बसला.. खूप जाड ,कच्ची आणि काहीशी करपलेली ती रोटी
बघितल्यावर एकूण जेवण काय दर्जाचे असेल याचा अंदाज आला. धान्याची कोठी उघडी होती म्हणून तिथे डोकावलो .
तर अक्षरश: जाळी लागलेले धान्य होते .खूपच निकृष्ट होते. आपण पकडले जातो आहोत हे
लक्षात येताच तो अधीक्षक थेट माझ्या अंगावर आला.तुमचा इथे येण्याचा काय संबध
इथपासून सुरुवात केली आणि शिव्या देण्यासारखा बोलत अंगावर येवू लागला ..माझ्या
सोबतच्या अधिकार्यांनी त्याच्यावर आरडाओरडा केला तेव्हा मागे सरकला... प्रसंग
लक्षात घेऊन आम्ही ती पोळी ताब्यात घेतली आणि निघालो.नांदेड ला समाजकल्याण अधिकार्यांना
भेटू असा विचार केला तर नांदेडला पोहोचेपर्यंत गाडीत असतानाच सोबतच्या व्यंकटेश
चौधरी या विस्ताराधिकार्यांच्या मोबाईल वर समाजकल्याण अधिकार्यांचा फोन
....तुम्ही शिक्षण विभागाचे लोक आमच्या समाजकल्याण खात्याच्या आश्रमशाळेत गेलेतच
का ...?हा त्यांचा प्रश्न होता आणि सकाळी जेवणात फेकून
दिलेली रोटी तुम्ही का उचलली असेही ते विचारत होते ...मला धक्काच बसला. जो
गैरव्यवहार दुरुस्त करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती ते करायला आम्ही मदत केली
तर ते आम्हालाच जाब विचारत होते ...आणि संस्थाचालकांची वकिली करत आम्हाला कायदे
शिकवत होते .काही मिनिटात त्यांना माहितीही मिळाली आणि ते स्वामिनिष्ठा ही दाखवू
लागले ... .याचा अर्थ संस्थाचालक या अधिकार्यांवर किती खर्च करत असतील याचा अंदाज
यावा.
त्यांना भेटण्यात अर्थच नव्हता ..त्यावेळी भटक्या विमुक्तांच्या आयोगाचे
अध्यक्ष बाळकृष्ण रेणके दिल्लीत होते .त्यांना झाला प्रकार सांगितला, त्यांनी फॅक्स करायला सांगितले. त्यांना फॅक्स केला. त्यांनी दिल्लीवरून
नोटिस पाठवली..पुढे त्यातून ती यंत्रणा किती दिवस सुधारली माहीत नाही पण ओरडल्याचे
समाधान मिळाले ....
मी खूप अस्वस्थ झालो...त्या रात्री मित्र मनोज बोरगावकर व राम शेवडीकरांना
म्हणालो
“महाराष्ट्रातल्या आदिवासी आणि समाजकल्याणाच्या
१५०० शाळा ..रोजची दोन जेवणे म्हणजे ३००० जेवणावर लक्ष ठेवायला रोज इतकी माणसे
आणायची कोठून...?आणि जेवण तपासण्याचे जर पैसे मिळू
लागले तर मी तरी माझी खात्री किती दिवस देवू शकेन ....?
संस्थाचालक
आणि आधिकारी यांचे साटेलोटे बघितल्यावर तर मला काही उत्तर च सापडेना ,मी म्हणालो
“त्या अधिक्षकाने मला आज खरच मारायलाच पाहिजे होते “
ते दोघे म्हणाले “ असं का म्हणता ..?
अगतिक होऊन मी म्हणालो “किमान
त्यानिमित्ताने तरी आश्रमशाळेच्या जेवणावर महाराष्ट्रात चर्चा झाली असती..’
हे वाचताना विचित्र वाटेल पण अगदी मनापासून सांगतो.हे जोपर्यंत हे भयावह
चित्र आपण बघत नाही तोपर्यंत ठीक आहे पण हे सारं बघितल्यावर आणि आपण काहीच करू शकत
नाही ही अगतिकता खूप पराभूत करते .खूप चडफड होते. अनेक दिवस जेवताना ती उपाशी ,केविलवाणी मुले आठवतात आणि स्वत:च्याच मर्यादांचा
खूप राग येतो ....
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
असाच अजून एकदा मार खाता खाता वाचलो....
एका आश्रमशाळेत
शिक्षक मंजूर पदे ६ असताना ७ शिक्षक कार्यरत होते. याचा अर्थ एक शिक्षक जास्त होता
व तो रिकामा राहत होता .....सर्वात ज्येष्ठ शिक्षक रिकामा राहून बाहेर व्यक्तिगत
कामाला फिरत होता.माझ्या ते लक्षात आल्यावर मी वरिष्ठ अधिकार्यांच्या लक्षात आणून
दिले.त्या कार्यालयाने काही कारवाई करण्याऐवजी फक्त ती तक्रार मी केल्या चे त्या
शिक्षकाला सांगितले.जेव्हा पुन्हा मी त्या शाळेवर गेलो .तेव्हा तो शिक्षक मला
शिवीगाळ करू लागला.. आणि चक्क मला मारायला धावला.त्या शाळेच्या मुख्याध्यापकाने
त्याला मिठी मारुन ओढत बाहेर ढकलले आणि दार लाऊन घेतले म्हणून मी वाचलो अन्यथा
मारच खाल्ला असता.त्याने त्या शिक्षकाला बाहेर नेले तर तो खिडकीतून शिव्या देत
होता.मी शांत राहिलो.
आमच्या व त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांना
सांगितले. त्याला बोलावून समज वगैरे देणे झाले पण मी त्याच्यावर कारवाईचा आग्रह
धरला .आदिवासी सचिव आयुक्त यांना पत्र लिहिली.पण काहीच घडले नाही.आमदारांना भेटलो.
आमदारांनी माझी बाजू घेतली .खूप खूप पाठपुरावा केला तेव्हा ३ महिन्यांनी त्याची
बदली झाली फक्त ५ किलोमीटर अंतरावरील आश्रमशाळेत...
माझा पाठपुरावा चालूच होता .एक दिवस तो कर्मचारी
ज्या जमातीचा होता .त्यांच्या हक्कासाठी लढणार्या संघटनेचे शिष्टमंडळ आले. मला
वाटले दिलगिरी व्यक्त करून विषय संपेल.पण मी तेथे गेलोच का ?इथपासून सुरुवात झाली आणि मी तक्रार मागे घेतली नाही तर अट्रोसिटी दाखल
करू अशी धमकी दिली.. ज्या लेकरांसाठी मी पाड्यापाड्यावर जाऊन ७०० शालाबाहय मुले
दाखल केली होती .दिवसरात्र त्याच गरिबांचा विचार करत होतो त्याच जमातीच्या
कर्मचारी संघटनेला मी त्या जमातीचा शत्रू वाटलो .मला राग
येण्यापेक्षा खूप वेदना झाल्या.. आपण केलेल्या कामाचे हे मूल्यमापन असते का ....? पुढे तो कर्मचारी निवृत्त झाला .त्याच्या पेन्शनला त्रास होऊ नये म्हणून
तक्रारीचा पाठपुरावा करू नये ही विनंती मी ही मान्य करून विषय सोडून दिला पण अशा
वेळी आपण एकटे असतो आणि आपलाच प्रामाणिकपणा
आपल्याला सिद्ध करावा लागतो हे खूपच क्लेशदायक असते...
आश्रम शाळा या विषयाचा क्लायमॅक्स तर पुढेच आहे .
दिल्लीला केंद्रीय नियोजन
आयोगाच्या समितीवर असताना विविध मंत्रालय बघायला जायचो.अशातच मनुष्यबळ विकास
मंत्रालयाजवळच्या आदिवासी विभागाचा बोर्ड बघून वळालो.आश्रमशाळा हा जिव्हाळ्याचा
विषय असल्याने आत गेलो.
देशपातळीवर आश्रमशाळेचे काम जे
कोणी बघत असेल त्याला भेटावे असे ठरविले. खोली नंबर ४०१ इतकेच तिथे कळाले. चौथ्या
मजल्यावर घिरट्या घालत १०० -१०० खोल्या ओलांडत जवळपास अर्ध्या तासाने तिथे
पोहोचलो. अखेत ती खोलो सापडली. आपण अनेक किलोमीटर चाललो आहोत असा भास झाला. तळातल्या
आश्रमशाळा चालतात कशा हे त्यांना सांगावे असे ठरविले होते. जवळपास ५ वाजत आलेले.
ऑफिस सुटायला जरी अजून पाऊण तास होता तरीसुद्धा शाळेतली पोरं जशी शाळा सुटताना
दप्तर आवरून बसतात तसाच काहीसा सीन सर्वत्र दिसत होता...
अशा unwanted वेळी नेमका पोहोचलो...तिथल्या आश्रमशाळा
विभाग पाहणार्या उपसचिव बाईंना मोबाइल चे मेसेज वाचताना मी डिस्टर्ब केलं होतं.
देशपातळीवर आश्रमशाळा हा विषय त्यांच्याकडे होता. मला अतिदुर्गम भागातील
बघितलेल्या आश्रमशाळा डोळ्यासमोर तरळल्या..तिथली उपाशी लेकर आणि शिक्षणाची
दुरावस्था हे सारं त्यांना मी माझ्या तोडक्या मोडक्या हिन्दी, इंग्रजीत सांगू लागलो..माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर काही परिणाम
दिसेना..त्या घड्याळाकडे बघत होत्या.
माझी
बकबक त्यांनी थांबवली आणि विचारले “तुम कौनसे स्टेट से हो ?“
मी
मोठ्या अपेक्षेने म्हणालो “महाराष्ट्र “
मला
वाटलं आता काहीतरी कारवाईच करतील.
त्या
म्हणाल्या “हम सिर्फ यहा फंड स डिसबर्स करते है .उनका विनियोग कैसे करे ये तो उस
स्टेट की बात है “
मी
म्हणालो “ पर मॅडम ये विनियोग यदी ठीक से नही होता तो आप ने देखना चाहीये “
त्या
म्हणाल्या “यदी आपको ये गलत लगता है तो आप महाराष्ट्र सरकार को कयू नही बोलते ?‘
या
वादावादीत काही अर्थ नव्हता .मी माझ्या पिशवीतून माझं पुस्तक काढलं.’शाळा आहे शिक्षण नाही’ या पुस्तकात आश्रम शाळेतील
विदारक चित्र असलेले फोटो आहेत. ते उपाशी मुलांचे फोटो ,इमारती
नसलेल्या आश्रमशाळांचे फोटो दाखविले आणि त्यांच्या चेहर्याकडे मी खूप उत्कंठतेने
अभिप्रायार्थ बघू लागलो ..वाटलं किमान माझे बोलणे नाही पण किमान हे फोटो तरी
त्यांना हलवून टाकतील.
त्यांनी थंडपणे ते फोटो मिटवून ठेवले आणि म्हणाल्या
“इसमे नई बात कया है ?ये तो हम सब जाणते है ….इस से भी बहोत कुछ हम जाणते है ..”
हे ऐकताच आपण तळातले काहीतरी सांगायला आलो आहे हा
अहंकार च गळून पडला.
मी म्हणालो
“तो मॅडम आप अॅक्शन कयू नही लेते ...?”.
वैतागून त्या म्हणाल्या “ मैने आपको बोला ना ये देखने
की सब जिम्मेदारी स्टेट की है ..”
पुन्हा चिकाटीने मी म्हणालो “ये देखने का आपको
अधिकार तो है ना .आप ओ अधिकार कयू नही इस्तेमाल करती..? “
त्या म्हणाल्या “कयू नही ..कयू नही .हम तो हमेशा
स्टेट मे जाते है “
हे ऐकून मला विलक्षण आनंद वाटला. मी विचारले “ तो
आप बहोत स्कूल देखती होगी “
त्या म्हणाल्या ‘नही .स्टेट
२ स्कूल सिलेक्ट करती है और हम वहा उनके साथ जाते है “
मी विचारले ‘पर मॅडम वो तो
बेस्ट स्कूल ही सिलेक्ट करेंगे ना “
त्या हसून म्हणाल्या “ये तो होता ही है ..लेकीन हम
ऊनको उस बेस्ट स्कूल मे ही बहोत प्रॉब्लेम दिखते है और बोलते है की तुम्हारे बेस्ट
स्कूल यदी ऐसे है तो बाकी कैसे होगे ...तो वो सारे अधिकारी चूप हो जाते है “
हे सारं त्या इतक्या गमतीने सांगत होत्या की उपाशी
लेकर शिक्षणाचा खेळखंडोबा मुलींवर होणारे अत्याचार याचे काहीच गांभीर्य त्यांना
नव्हते..
शेवटी मी पुन्हा पुन्हा तेच तेच बोलतो आहे हे लक्षात येताच त्यांनी मला
महाराष्ट्राच्या आदिवासी सचिवांचे नाव सांगितले (जणू ते मला माहीतच नव्हतं..! )
आणि माझे बोलणे तोडून त्या उठल्याच...म्हणाल्या ४ वाजेनंतर मी कुणालाच भेटत
नाही. त्या ऑफिस खाली त्यांच्या घराकडे जाणारी बस लागते आणि ती हुकली तर १० मिनिटे
चालावे लागते . माझ्या डोळ्यासमोर कामाला जाताना ५ किलोमीटर चालणारे आदिवासी आले.
मेळघाटात डोक्यावर लाकडा ची मोळी घेऊन चालणार्या महिला आल्या आणि त्यांच्या साठी
काम करणार्या बाईंसाठी १० मिंनिटांची बस ही समस्या होती...
थांबण्यात
अर्थच नव्हता .मी त्यांना कार्ड मागितले.. त्या म्हणाल्या “नही .हम पब्लिसिटी नही
चाहते “
मला वाक्याचा अर्थ च कळाला नाही
मी ऑफिस बाहेर खाली रस्त्यावर आलो आणि दिल्लीतल्या प्रचंड गर्दीचा भाग झालो.
मनात आलं की ज्यांना शिक्षण आणि आश्रमशाळांवर थेट
नियंत्रण ठेवण्याचा पगार मिळतो ते पगार घेऊन इतके बेफिकीर झाले आहेत आणि
गावोगावीच्या कार्यकर्त्यांनी आश्रमशाळा चालकांशी संघर्ष घ्यायचा..खरच आपलच काही चुकतय
का ...आपण उगाचच तिथ लक्ष घालतोय का ?असे नैराश्येपोटी
मनात विचार येऊ लागले..
बसच्या गर्दीत स्वत:च्या क्षुद्रत्वाची भावना अधिकच
गडद झाली.
या व्यवस्थेच्या अवाढव्य यंत्राला आपण हलवण दुरच पण
हात ही लाऊ शकत नाही ही असहायता अधिकच अगतिक करत होती.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
80 poxaa jaast AaEamaSaaLa maI
baarka[-nao baiGatlyaamauLo yaa saacyaat kahI sauQaarNaa hao[-la Asao malaa
KrcaM vaaTt naahI.yaavar ]paya mhNaUna malaa vaaTto kI AapNa yaa AaEamaSaaLa
sarL ivasaija-t kravyaat va hI maulao SahrI Baagaat AaNaUna आश्रमशाळा
vasatIgaRhat $paMtrNa kravaot hI saUcanaa Qa@kadayak
vaaTola pNa vastuisqatI baGaayalaa hvaI.
Aaja AaEamaSaaLa duga-ma izkaNaI zovaNyaatlao taoTo kaya Aahot..
duga-ma izkaNaI yaa SaaLa Asalyaanao AiQakarI BaoTI KUp kmaI
dotat.%yaamauLo jaovaNa va iSaxaNaacaa djaa- saat%yaanao tpasaला
jaat
naahIt.%yaamauLo duga-matocaa gaOrfayada Gaotlaa jaatao.caaMgalao jaovaNa Anaok
izkaNaI idlao jaat नाही .%yaacap`maaNao
iSaxaNaakDo dula-xa kolao jaato.jaMgalaat yaa SaaLa Asalyaanao sap-dMSa
haoNyaacyaa GaTnaa KUp GaDtat.maagaIla vaYaI- 110 ivaVaqaI- maharaYT/atlyaa
AaEamaSaaLot केवळ सर्पदंशाने maR%yaU
pavalao.yaacaa Aqa- spYT Aaho kI dUr jaMgalaat yaa SaaLa zovaNyaacao kaoNatoca
karNa Aata naahI.AaEamaSaaLa yaa ASaa kaLat inamaa-Na Jaalyaa kI jaovha
AaidvaasaI Baagaat p`aqaimak va maaQyaimak SaaLa navh%yaa tovha iSaxaNaacaI
saaoya kravaI laagalaI pNa Aata p`aqaimak SaaLa ek iklaaomaITrmaQyao
paohaocalaI Aaho va ikmaana 5 iklaaomaITrmaQyao hayaskUla Aaho.%yaamauLo Aata
AaEamaSaaLa iSaxaNaacaI garja ]rlaI naahI.AByaasak`ma AaidvaasaI maulaaMnaa
taoca iSakvalaa jaatao kI jaao puNao mauMba[-t iSakvalaa jaatao.%yaamauLo jar
AaidvaasaI maulaaMnaa AByaasak`ma p`klp ho AaidvaasaI Baaga jaMgala yaavar
AvalaMbaUna nasaola tr yaa SaaLa yaa duga-ma izkaNaI zovaNyaat Aata kaya
AaOica%ya Aaho .pavasaaLyaat yaa jaMgalaatlyaa SaaLa caalaivaNao AitSaya ijakrIcao
Asato yaacao karNa jaMgalaat pa}sa
tI`va` Asatao.pa}sa Anaok idvasa ]GaDt naahI.p~o Asatat.%yaatUna paNaI
Aat yaoto.qaMDI p`caMD Asato.kpDo vaaLt naahI.igarNyaaMtUna Qaanya dLlao jaat
naahI.vaIja Anaok idvasa nasato.maulao AajaarI haotat.dvaaKanao javaL
nasatat.tovha yaa SaaLa AapNa yaa jaMgalaat ka zovatao Aahaot. naahI yaacao karNa
vagaa-varcao p~o vaajat rahतात त्यामुळे pavasaaLyaaat
iSakविणे च कठीण होते .vaaro vaaht Asato.iKD@yaa vaajat Asatat.%yaamauLo iSakivaNao mauSkIla haovaUna
jaato.pUvaI- iSaxak kma-caarI ho AaEamaSaaLot raht.Aaja ApDa]na [tko vaaZlao
Aaho kI 100 iklaaomaITrva$na iSaxak kma-caarI yaotat.%yaamauLo yaa SaaLa itqao
zovaNao caalaivaNao mauSkIla Jaalao Aaho.
%yaamauLo Asao saUcavaavaosao vaaTto kI yaa
AaEamaSaaLa talau@yaacyaa gaavaat AaNalaI pahIjaot.p`aqaimak stravar iSaxaNa ho
maulaanao palakabaraobarca Gyaavao Asao krayalaa hvao karNa Aaja ijalha
pirYadocyaa SaaLa yaa p`%yaok 1 iklaaomaITrpya-Mt paohaocalyaa Aahot.%yaamauLo
GarajavaLca maUla iSakU Sakto.punha AaEamaSaaLot jyaa sauivaQaa idlyaa jaatat
%yaa sava-ca Aata जिल्हा परिषद शाळा ही dotat punha
p`itivaVaqaI- 5000 $pyao sauvaNa-mahao%savaI iSaYyavaR%tIhI idlaI jaato.tI
iSaYyavaR%tI AaNaKI vaaZvalaI tr palak AaNaKI ]%saahanao maulaaMnaa ijalha
pirYad SaaLot pazvatIla.
%yaacao Anaok fayado haotIla…
ektr [tr
jaatIcyaa maulaaMsaaobat hI maulao iSaktIla.%yaamauLo %yaaMcao saamaaijakIkrNa hao[-la.[tr maulaaMSaI tI spQaa-
krtIla.naagarI samaUhacaa pircaya hao[-la %yaamauLo maaozo Jaalyaavar
%yaaMcyaat nyaunagaMD inamaa-Na haoNaar naahI.yaacaa Aqa- AaidvaasaI
maulaaMmaQaIla %yaaMcaI vaOiSaYT pUsaavaIt Asao Aijabaat naahI pNa tI japtanaa
naagarI samaajaaSaI saMpk- garjaocaa Aaho.iSaxaNaacaI saaoya talau@yaacyaa
gaavaat Asatoca.%yaa gaavaatIla KajagaI va sarkarI maaQyaimak SaaLot hI maulao
daKla kravaIt.yaat Saasanaacaa एकाच वेळी दोन ठिकाणी
iSakivaNyaacaa Kca- vaacaola.ekaca vagaa-t hI
naagarI va AaidvaasaI maulao iSaktIla.jyaa p`maaNaat yaa maulaaMcyaa
saM#yaomauLo tukDyaa vaaZtIla %yaa p`maaNaat AaEamaSaaLa iSaxakaMcao samaaयोjana maaQyaimak
SaaLaMmaQyao haovaUna jaa[-la.daoGaaMcaI ekmaokaMSaI AaMtrik`yaa hao[-la.hI
maulao SahrI naagarI vaatavarNaat ksao rahavao ho iSaktIla.yaa vaatavarNaacaI
%yaaMnaa BaItI vaaTNaar naahI.AaidvaasaI ivaBaagaakDo iSaxaNaacao kama pahNaarI
svatM~ yaM~Naa naahIca tovha yaainaima%tanao AaidvaasaI ivaBaagaacaI
iSaxaNaacaI jabaabadarIhI kmaI hao[-la.AaEamaSaaLonao f@t inavaasa va
joavaNaacaI jabaabadarI GyaavaI.punha hI
vasatIgaRho talau@yaacyaa gaavaI Asalyaanao AiQakarI satt BaoTI dotIla.p~kar
saamaaijak kaya-kto- %yaavar inayaM~Na zovatIla.punha Saasanaanao jar
gaavaatIla maihlaa maMDLo bacatgaT kaya-kto- jyaoYz naagairk yaaMcaIo inayaM~Na
saimatI krNao Sa@ya Aaho.sap-dMSa va tIva` pavasaaLyaatIla haoNaaro hala
yaatUna maulaaMcaI sauTka hao[-la.
---------------------------------------------------------------------------------------------
Aaja
maharaYT/at 2012 13 cyaa AakDovaarInausaar 552 SaasakIya AaEamaSaaLa Aahot.%yaat
naaiSak ivaBaagaat 222 ठाNao ivaBaagaat 129 AmaravatI ivaBaagaat
100 tr naagapUr ivaBaagaat 101 AaEamaSaaLa Aahot.%yaat 108339maulao va 99624
maulaI आहेत. ekUNa 207963 ivaVaqaI- iSaxaNa Gaot
Aahot.
आश्रमशाळा या विषयावर टिकात्मक लिहिताना हे
ही मान्य केले पाहिजे की आज आदिवासी भटक्या जमातीत जो एक मध्यमवर्ग निर्माण
झाला आहे त्याचे श्रेय हे आश्रमशाळा ना आहे .यामुळे आदिवासीममधील पहिली पिढी शिकली
आणि सरकारी नोकरीत गेली.हे आश्रमशाळांचे ऐतिहासिक योगदान नोंदवावे लागेल
त्याचप्रमाणे आदिवासी व भटक्यात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण केवळ आश्रम शाळामुळे
वाढले. मेळघाटात टेम्ब्रूसोडा या आश्रमशाळेत ६०० मुली आहेत आणि त्या त्यांच्या
घरातील पहिल्या शिकणार्या कोरकू या आदिवासी जमातीतील आहेत. हे कसे विसरता येईल
.ती शाळा बघताना अक्षरश: अंगावर शहारे आले
.हे याच व्यवस्थेने घडवले आहे हे कसे विसरता येईल...?
परंतु माझी वेदना ही आहे की
गडचिरोली चंद्रपुर मेळघाट परिसरात मला ५२ गावे अशी आढळली की गावात ५० वर्षापासून
शाळा आहे पण गावात ७ वी पास तरुण नाही. आश्रमशाळांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे
शालाबाह्य मुलांची संख्या वाढली आहे.पालक मुले दाखल करतात ,अनेक मुले गळती होतात आणि शाळा ती मुले हजर करण्याचा प्रयत्न करत नाहीत.जेवणाचा दर्जा व
इतर कारणाने ही मुले गळती होतात.
याचा अर्थ केवळ सुविधा देऊन
उपयोग नाही तर त्या प्रभावी ,मानवी चेहर्याच्या
संवेदनशील कशा बनवायच्या ही आजची समस्या
आहे.
हेरंब
कुलकर्णी
herambkulkarni1971@ gmail.com
फोन ९२७०९४७९७१
हा लेख प्रस्तुत लेखकाच्या ‘माझी शिक्षण
परिक्रमा’ राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकातून घेतला आहे
‘

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा