कार्यकर्ता मारणं सर्वात सोपं असतं...(कविता) हेरंब कुलकर्णी
(दाभोळकर पानसरे यांच्या हत्येवर कविता )
कार्यकर्ता
मारणं सर्वात सोपं असतं...
मासा
मारायला किमान पाण्यात जावं लागतं
वाघ मारायला तर थेट जंगलात जावं लागतं
ह्या शिकारींपेक्षा खुप खुप सोप्प असतं
भर दिवसा रस्त्यात कार्यकर्ता मारणं !
वाघ मारायला तर थेट जंगलात जावं लागतं
ह्या शिकारींपेक्षा खुप खुप सोप्प असतं
भर दिवसा रस्त्यात कार्यकर्ता मारणं !
कार्यकर्त्याला
मारणं सोपं असतं यासाठीही
झेड प्लस सेक्युरीटी नसलेला तो
मारण्यासाठी मारेकऱ्यांना
कुठेही उपलब्ध असतो...कधीही
झेड प्लस सेक्युरीटी नसलेला तो
मारण्यासाठी मारेकऱ्यांना
कुठेही उपलब्ध असतो...कधीही
प्रस्थापित नेत्याला मारणं सोडाच
त्याच्या फ्लेक्सला थोड़ी इजा झाली तरी
इथं पेटतात शहरं आणि माणसंसुद्धा
कार्यकर्त्याला
मारणं सोपं यासाठीही
की कार्यकर्त्याचे अनुयायी असतात अहिंसेचे पुजारी
करतात फ़क्त निदर्शने आणि उपोषणं
ज्याने आमचं सरकार पडत नाही,
की शेअरबाजार गडगडत नाही...
की कार्यकर्त्याचे अनुयायी असतात अहिंसेचे पुजारी
करतात फ़क्त निदर्शने आणि उपोषणं
ज्याने आमचं सरकार पडत नाही,
की शेअरबाजार गडगडत नाही...
धर्मांधाचे
बुरखे फाड़त
' इंडीया' च्या वेगवान विकासरथाला
अड़थळे ठरणारे
'स्पीडब्रेकर्स' कार्यकर्ते आता उखडायला हवेत...
' इंडीया' च्या वेगवान विकासरथाला
अड़थळे ठरणारे
'स्पीडब्रेकर्स' कार्यकर्ते आता उखडायला हवेत...
शोषितांच्या
डोळ्यातील विद्रोही स्वप्न
मारण्यापेक्षा
कार्यकर्त्यांना मारणं खुप खुप सोपं असतं....!
मारण्यापेक्षा
कार्यकर्त्यांना मारणं खुप खुप सोपं असतं....!
हेरंब कुलकर्णी.
Dr.दाभोळकर सरांना भावपूर्ण आदरांजली.💐
उत्तर द्याहटवाअगदी कडवट सत्य
उत्तर द्याहटवाखरंच आवघड आहे सगळं
उत्तर द्याहटवा