कॉमन मॅन
(कविता)
--- हेरंब कुलकर्णी
तूच मताची मोहोर उठवली , आणि लोकशाही सुरू झाली
तूच त्यांना राजा म्हटले ,ते आमदार ,खासदार झाले
तूच कायद्यापुढे मान तुकवलीस, आणि संसद सार्वभौम झाली
तूच चपला झिजवून घेतल्या लालफित
गळ्याला फास झाली
तूच स्वप्नाना हाका मारल्या, जाहिरनाम्यांचे जन्म झाले
त्यांनी खोटा आदर दिला , तू मतदार राजा झाला
ते सभेत बोलू लागले ,तू निमूट श्रोता झाला
ते कायदे करू लागले , तू घाण्याचा बैल झालास
ते पैशाने नाचवू लागले , तू प्रचारात माकड झालास
ते मीडिया त मिरवू लागले , तुझा तू लेखकू केलास
बॉम्बस्फोटातील होणार्या ठिकर्यातही
तूच
निर्वासितांच्या लोंढयातही तूच
भुकबळी, कुपोषणाने मरणाराही तूच
घोषणांकडे आशेने बघणाराही तूच
आत्महत्या करणारा शेतकरी तूच
धरणात सर्वस्व गमावणारा तूच आणि
नुकसानभरपाईसाठी खेटा घालणाराही
तूच
फुटपाथवर झोपून ‘ मेरा भारत महान’ म्हणणाराही तूच
तू दिसतोस मला नेहमी,
रेशनच्या
रांगेपासून तर मतदानाच्या रांगेपर्यंत
कधी कर भरताना --- लाल फीत चरकात
फिरताना
लोकलमध्ये टांगलेला – गर्दीत
बिनचेहर्याने पांगलेला
बगळ्यांचे उंबरे झिजवताना ---- ते
मस्तीने तुला खिजवताना
तुझ्या विश्व --रूप दर्शनाने,
माझा
अर्जुन करणार्या हे असामान्य सामान्य माणसा
नरकप्राय झोपडपट्टीपासून दूर
जंगलात
जनावरांचे जीणे जगताना
तुझ्यातील संताप, बंडखोरीला, कुठल्या दरीत तू खोल ढकलून देतोस ?
‘सीसिफस’ सारखी
पुन्हा पुन्हा अंगावर येणारी शिळा डोंगरमाथ्याकडे
निमूटपणे घेवून जाणारा तू
...
अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी चिरंजीवी वेदना घेवून
बोटभर तेलासाठी मतदानाच्या रांगेत
उभा राहणारा तू
तुझ्या या मौनाला, सोशिकतेला संतत्वाची ऊंची देवू
की तुला भेकड ठरवून तोंडसुख घेवू ?
स्वत:च स्वत:ला लक्षमणरेषा घालून
तू मताची भिक्षा घालतच राहिला
आणि ते स्वप्नांचा कांचनमृग दाखवत
रावण होऊन लुटतच राहिले तुला
तुझ्या सामान्यपणावरच उभा जगातला हा
असामान्य लोकशाहीचा डोलारा
तुझ्या सोशीकतेला चूड लाव रे आता
संसदेपुढं तो महात्मा डोळे मिटून बसलेला
आणि इथे मिश्किल नजरेनं मौन सोशिक
होऊन जगणारा तू
मौन असणे तुझे सामर्थ्य की मर्यादा
?
याचा विचार करताना मी ही मौन होतो
रे कॉमन मॅन ....
हेरंब कुलकर्णी
८२०८५८९१९५
( ही प्रमुख कविता असलेला हेरंब कुलकर्णी यांचा कॉमन मॅन हा कविता संग्रह ग्रंथाली प्रकाशन यांनी प्रसिद्ध केला आहे )


उपहासगर्भ कविता . काळजाचा ठाघेते .
उत्तर द्याहटवादर 3 -3 वर्षानी निवडणूका व्हायला हव्यात.यातून पैशाचा राजकरणा वरील प्रभाव कमी होईल.
उत्तर द्याहटवाअधिक महितिसाठी www.janraja.com