पुस्तकांशी मैत्री करायला लावणारा शिक्षक

विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणारे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील केमापूर शाळेतील
मुख्याध्यापक शरद ठकार यांची हेरंब कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत

प्रश्न – विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून नेमके काय प्रयत्न केले ?

उत्तर – मी स्वत: कवी असल्यामुळे बालवयातच माझी पुस्तकांशी मैत्री झाली. विद्यार्थींमध्ये
वाचनाची आवड निर्माण होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन  मुलांना विविध बाल मासिक, पुस्तके
वाचायला मिळावीत म्हणून सहकारी शिक्षकांच्या मदतीने  शालेय वाचनालय सुरू केले. शाळेत
विद्यार्थींसाठी किशोर,ऋग्वेद,वयम, लोकराज्य, जीवन शिक्षण, खेळगडी, झंप्या, पालकनीती, जीवन
गौरव,पाणिनी,छात्र प्रबोधन,प्रज्वलित मने यासारखी मुलांना आणि शिक्षकांना वाचण्याची आवड
निर्माण व्हावी  म्हणून मराठी संशोधन पत्रिका, अक्षर पेरणी,अक्षर गाथा,प्रतिष्ठान,
ऊर्मी,आशयघन,मुक्त शब्द, शब्द रूची,सर्वधारा,चपराक,ललिता,कवितारती,खेळ, अक्षर वाङमय
नवअनुष्ठूभ,काव्याग्रह,अक्षर गणगोत ह्या  मासिकांची आणि त्रैमासिकांची शाळा वर्गणीदार आहे.

प्रश्न – विद्यार्थ्यांच्या वाचनाचा उपक्रम नेमका कसा राबवला जातो ?

उत्तर -- शालेय वेळातील एक तास वाचनाचा हा उपक्रम राबवला त्या अंतर्गत शाळेत दररोज
विद्यार्थी त्यांना आवडतीलते मासिक किंवा गोष्टीचे पुस्तक वाचतात.विद्यार्थ्यांन सोबतच शिक्षक
ही त्यांना पाहिजे ते मासिक पुस्तकांचे वाचन करतात त्यामुळे मुलांना आणि शिक्षकांना वाचनाची
गोडी निर्माण झाली आहे. प्रत्येक महिन्याचे नवीन मासिक आम्हाला कधी वाचायला मिळेल ही
उत्सुकता मुलांना वाटते.या वाचनाच्या आवडीतूनच मंदिरा मंदिरात पोथ्यांचे वाचन केले जाते
त्याच पध्दतीने गावातील मंदिरात मुलांनी स्वयंप्रेरणेने दररोज वाचन पाठ घ्यायला सुरुवात
केली.त्यात रोज वाचक वेगवेगळा ठेवून मुलांनी शामची आई, मी एक स्वप्न पाहिले,मन मे है
विश्वास,नापास मुलांची गोष्ट या पुस्तकांचे वाचन मंदिरात केले.मुलां सोबत गावातील जेष्ठांनीही
या वाचनाचा अस्वाद घेतला. आवांतर वाचनामूळे मुलं छोटी छोटी गोष्टींची, गाण्याची पुस्तक वाचू
लागली आणि त्यातूनच परभणी जिल्हा परिषदेने घेतलेल्या अध्ययन निष्पत्ती परीक्षेत आमची
शाळा टाॅप फाईव्ह मध्ये आली त्या बद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी मा.बी.पी.पृथ्वीराज यांनी
आमच्या शाळेचा सन्मान पत्र देऊन सन्मान केला. 

प्रश्न—वाचनाचा परिणाम म्हणून मुले लेखन करू लागलीत का ?

उत्तर – मी कवी असल्याने विविध साहित्य संमेलना मधून कविता वाचण्यासाठी जात असतो.
म्हणून माझ्या शाळेत तीन वर्षापासून बालिका दिनाच्या निमित्ताने  बालिका साहित्य संमेलन
घेऊन केमापूर शाळेसोबतच शेजारच्या शाळेतील मुलांच्या कविता व कथाकथनाच्या स्पर्धा घेऊन

मुलांना वाचन व लेखनाची गोडी लावून त्यांना व्यक्त होण्याची संधी निर्माण करून दिल्या जाते.
मुलांना वाचनाची गोडी लागली आणि शाळेतील मुलं लिहू, वाचू लागली, कविता करू
लागली.शाळेत मुलांनी स्वतःच्या कवितेचा प्रकल्प तयार केला आहेत.मुलांच्या कविता दैनिकातून
प्रकाशित होत आहेत.पाच सहकारी शिक्षकांनी या शाळेत आल्यानंतर चार जणांनी  एम.ए.तर
एकजणाने बी.ए.केले आहे सहशिक्षीका प्रणिता गाडे याही कविता लेखन करत आहेत. मुलांना
वाचन लेखनाची गोडी लागल्या नंतर प्रत्यक्ष लेखक कसे असतात कसे बोलतात या संदर्भात
उत्सुकता असते म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम राबवून
प्रत्यक्षात लेखकांशी मोकळ्या गप्पा गोष्टी व मार्गदर्शनासाठी नाटककार त्र्यंबक वडसकर,कवी
सुरेश हिवाळे,साहित्यिका सुमिता सबणिस यांचे शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

प्रश्न – विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके कोठून उपलब्ध केली ?

उत्तर -- शाळेतील माजी विद्यार्थी मनोहर आंधळे यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी आता पर्यंत सतरा
हजार रूपयांची पुस्तके भेट दिलेली आहेत.तसेच सातारा येथील साहित्यिका सावित्री जगदाळे
यांच्या आज्जो पिझ्झा पुस्तकाचे परिक्षण शाळेतील मुलांनी केल्या बद्दल त्यांनीही शाळेला
पुस्तक भेट पाठवलेली आहेत.

हेरंब कुलकर्णी

टिप्पण्या